देशातील 65 शहरांमध्ये पाईप गॅसने LPG चा पुरवठा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 10:08 AM

Pipe Gas | सध्या 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 228 भागांमध्ये पाईप गॅस योजनेसाठी एजन्सीज नेमण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील 53 टक्के भाग आणि 70 टक्के लोकसंख्येचा समावेश होतो.

देशातील 65 शहरांमध्ये पाईप गॅसने LPG चा पुरवठा
पाईप गॅस

मुंबई: सरकारकडून देशातील प्रमुख शहरांपाठोपाठ आता लहान शहरांमध्येही पाईप गॅस पोहोचवण्याची योजना आखण्यात आली आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील नियामक संस्था असणाऱ्या PNGRB ने देशातील 65 शहरांमध्ये पाईप गॅस पोहोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. यामध्ये नागपूर, पठाणकोट, मदुराईसह 65 शहरांचा समावेश आहे. यासाठी लवकरच निवीदा काढल्या जातील.

सध्या 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 228 भागांमध्ये पाईप गॅस योजनेसाठी एजन्सीज नेमण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील 53 टक्के भाग आणि 70 टक्के लोकसंख्येचा समावेश होतो.

406 जिल्ह्यात सिटी गॅस नेटवर्क

PNGRB कडून 2018 आणि 2019 या दोन वर्षांमध्ये 136 शहरांमध्ये सीएनजी पंप आणि पाईप गॅसच्या वितरणासाठी परवाने वितरीत करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास 406 जिल्ह्यांमध्ये गॅस नेटर्वकचा विस्तार झाला होता. 2030 मध्ये देशातील एकूण उर्जा वापरापैकी 15 टक्के हिस्सा पारंपरिक गॅसचा असेल, हे PNGRB चे उद्दिष्ट आहे.

मुंबईत पाईप गॅसच्या दरात वाढ

काही दिवसांपूर्वी मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. महानगर गॅसकडून सीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार CNG च्या दरात प्रतिकिलो 2 रुपये 58 पैसे आणि घरगुती गॅसच्या दरात प्रतियुनिट 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांच्या घरातील बजेटही कोलमडणार आहे.

नवे दर किती?

महानगर गॅसच्या एक किलो सीएनजीसाठी आता 51.98 रुपये मोजावे लागतील. तर पाईप गॅसच्या स्लॅब 1 साठी 30.40 रुपये प्रतियुनिट आणि स्लॅब 2 साठी 36 रुपये प्रतियुनिट इतकी किंमत असेल. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅसच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली होती.

संबंधित बातम्या:

CNG Price Hike Mumbai: मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ

वाशीत गॅसची पाईपलाईन फुटल्याने एकच तारांबळ, घरगुती गॅस पुरवठा खंडित

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नाशिककरांचा प्रवास चिखलमय, कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI