घरी बनवा ड्रायफ्रूट लाडू, लक्षात ठेवा ‘ही’ सोपी रेसिपी, चवीसोबतच आरोग्यासाठी फायदेशीर

ड्रायफ्रूट हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि या ड्रायफ्रूटचे सेवन अनेक प्रकारे केले जाते, जसे की लाडू बनवून. या लेखात ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगितली आहे, जी साखरेशिवाय नैसर्गिक गोडवा देते, चला तर मग आजच्या ड्रायफ्रूट लाडुची रेसिपी जाणून घेण्यासोबतच आरोग्यासाठी कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात...

घरी बनवा ड्रायफ्रूट लाडू, लक्षात ठेवा ही सोपी रेसिपी, चवीसोबतच आरोग्यासाठी फायदेशीर
dry fruits
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 10:30 PM

आपला भारतात प्रत्येक राज्यानुसार खाण्या-पिण्याची परंपरा, पद्धत बदलत असते. त्यामुळे अनेकप्रकारचे पदार्थांची चव घेता येते. मसालेदार पदार्थांपासून ते गोड पदार्थांपर्यंत, तुम्हाला अनेक प्रकारचे पदार्थ मिळतील. त्यातच जे काही पदार्थ बनवले जातात ते आरोग्यासाठी व शरीरासाठी तितकेच फायदेशीर असतात. तर आपल्या भारतीय स्वयंपाकघरात जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा आयुर्वेदातही उल्लेख आहे. ते अन्नाची चव वाढवतात.

स्वयंपाकघरात असलेले डायफ्रूट देखील आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. त्यात सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. बहुतेक लोकं सकाळी रिकाम्या पोटी डायफ्रूटचे सेवन करतात, तर काही लोकं डायफ्रूटचा वापर पुलावमध्ये देखील करतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही डायफ्रूटचे लाडू देखील बनवू शकता. त्यांची चव अप्रतिम आहे. तुम्ही डायफ्रूटपासून तयार केलेले लाडू दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून देखील खाऊ शकता.

याशिवाय जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते दुधासोबत देखील घेऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला ड्रायफ्रूट लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया-

डायफ्रूट लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप खजूर

अर्धा कप काजू

अर्धा कप बदाम

अर्धा कप अक्रोड

पिस्ता दोन टेबलस्पून

दोन टेबलस्पून मनुका

तूप एक ते दीड टेबलस्पून

दोन टेबलस्पून सुके किसलेले नारळ

वेलची पावडर अर्धा टीस्पून

ड्राय फ्रूट लाडू कसे बनवायचे?

लाडू बनवण्यासाठी, प्रथम काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांचे लहान तुकडे करा किंवा बारीक करा. यानंतर, मनुके आणि खजूर बारीक करून घ्या.
आता एका पॅनमध्ये तूप टाका. आता वरील बारीक केलेले डायफ्रूट मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजा. यानंतर ते एका प्लेटमध्ये काढा. त्याच पॅनमध्ये थोडे तूप टाका आणि त्यात बारीक केलेले खजूर टाका. खजूर मऊ होईपर्यंत दोन मिनिटे भाजून घ्या. आता खजूरमध्ये सर्व भाजलेले डायफ्रूट, मनुके आणि वेलची पावडर टाका आणि चांगले मिक्स करा. यानंतर ते थोडे थंड होऊ द्या.आता हातावर तूप लावा आणि छोटे लाडू बनवा. लाडूवर बारीक किसलेला सुका नारळ किंवा पिस्त्याने एक एक करून सजवा.

डायफ्रूटच्या लाडूचे फायदे

साखरेशिवाय नैसर्गिक गोडवा मिळतो.

डायफ्रूट लाडू खाल्ल्याने आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

तर आरोग्यासाठी फायदेशीर असलेले लाडु मुलांसाठी आणि प्रौढांसाठी फायदेशीर आहेत.
हे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)