रात्री झोपताना स्मार्टफोन आपल्यापासून किती लांब हवा, जाणून घ्या महत्वाची कारणे

अनेक जण रात्री झोपताना मोबाईल आपल्याजवळ ठेऊन झोपतात. रात्री एखादा फोन झाल्यास उठावे लागू नये, यामुळे मोबाईल उशीखाली किंवा आपल्याजवळच ठेवला जातो. परंतु मोबाईल आपल्याजवळ ठेवणे घातक आहे.

रात्री झोपताना स्मार्टफोन आपल्यापासून किती लांब हवा, जाणून घ्या महत्वाची कारणे
mobile
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 10:57 AM

स्मार्टफोन प्रत्येक घरात नाही तर प्रत्येकाच्या हातात आला आहे. हा स्मार्टफोन 24 तास जवळच असतो. काही वेळ मोबाईलपासून काही जण दूर राहू शकत नाही. अनेक जण रात्री झोपताना मोबाईल आपल्याजवळ ठेऊन झोपतात. रात्री एखादा फोन झाल्यास उठावे लागू नये, यामुळे मोबाईल उशीखाली किंवा आपल्याजवळच ठेवला जातो. परंतु मोबाईल आपल्याजवळ ठेवणे घातक आहे. रात्री मोबाईल आपल्याजवळ ठेवणे  तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. तुम्हाला हा धोका टाळायचा असेल तर मोबाईल आपल्यापासून 3 ते 4 फूट लांब ठेवणे आवश्यक आहे.

मोबाईल जवळ ठेवल्यास काय आहेत धोके?

  1. झोपेत अडथळा: स्मार्टफोनमधील निळा रंग मेलाटोनिनच्या उत्पादनासाठी बाधक ठरतो. मेलोटोनिन रात्रीच्या वेळी मेंदूमध्ये स्रावित होणारे संप्रेरक आहे. झोपेच्या नियमनात त्याची भूमिका महत्वाची असते. मोबाईलमधील निळा रंग मलाटोनिनवर प्रभाव करतो. त्यामुळे शांत आणि गाढ झोप लागत नाही. तसेच फोनचे नोटिफिकेशन आणि अलर्ट्स झोपेत अडथळा ठरतात.
  2. आग लागण्याचा धोका : स्मार्टफोन उशीखाली ठेवल्यास उष्णता तयार होते. त्यामुळे फोन गरम होऊ शकतो. तसेच आग लागण्याचा धोका असतो. तसेच फोनच्या नोटिफिकेशनमधील व्हायब्रेशनमुळे तुमची झोप मोडली जाते.
  3. मानसिक तनाव : स्मार्टफोनचा सतत वापर मानसिक तणाव आणि चिंतेचे कारण बनू शकतो. रात्री जवळ ठेऊन झोपल्यामुळे मनाला पूर्णपणे आराम मिळत नाही. त्यामुळे सकाळी तुम्ही वैतागलेले असतात. संपूर्ण दिवस तणावात राहतात.
  4. आरोग्याच्या समस्या : दीर्घकाळ स्मार्टफोनच्या जवळ राहिल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. डोळ्यात जळजळ होणे, डोके दुखणे, कान दुखणे यासारखे प्रकार होतात. स्मार्टफोन लांब ठेवून झोपल्यामुळे तुमची झोपच चांगली होते, असे नाही तर आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे चांगली झोप आणि चांगल्या आरोग्यासाठी स्मार्टफोन आपल्यापासून लांब ठेवून झोपणेच फायदेशीर आहे.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.