सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार, 1 ऑगस्टपासून कोणकोणते नवे नियम लागू?

Rules Change from 1st August : नव्या महिन्याच्या सुरुवातीला नवे नियम लागू होणार आहेत.  1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.

सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार, 1 ऑगस्टपासून कोणकोणते नवे नियम लागू?
ईपीएफ अॅडव्हान्स
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 11:15 AM

मुंबई: नव्या महिन्याच्या सुरुवातीला नवे नियम लागू होणार आहेत.  1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबंधीच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ केली आहे. याशिवाय, नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांतही बदल झाले आहेत. त्यामुळे तुमचा पगार किंवा पेन्शन सुट्टीच्या दिवशीही खात्यामध्ये जमा होईल.

ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ

आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमात बदल केल्यामुळे इंटरचेंज शुल्क वाढले आहे. परिणामी आर्थिक व्यवहारांवर जादा शुल्क आकारले जाणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

RBI ने इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये इतके केले आहे. तर बिगरआर्थिक सेवांसाठीचे शुल्क 5 रुपयांवरुन वाढवून 6 रुपये इतके करण्यात आले आहे. RBI च्या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून महिन्याला पाच व्यवहार विनाशुल्क करता येतात. यामध्ये अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करणेही ग्राह्य ठरले जाते.

सुट्टीच्या दिवशीही पगार बँक खात्यात जमा होणार

1 ऑगस्टपासून पेन्शन, वेतन आणि ईएमआय यासारख्या महत्वपूर्ण व्यवहारांसाठी सुट्टी असल्यास ताटकळत राहावे लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटड क्लिअरिंग हाऊसच्या (NACH) नियमांत बदल केले आहेत. NACH ही यंत्रणा NPCI कडून हाताळली जाते. या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डिव्हीडंट, व्याज, वेतन यासारखे व्यवहार पार पडतात. सध्या NACH ही यंत्रणा बँका सुरु असतानाच काम करते. परंतु 1 ऑगस्टपासून ही यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत राहील.

एनएसीएच (NACH-National Automated Clearing House) सेवा 1 ऑगस्टपासून 24×7 कार्य करणार आहे. याचा फायदा नोकरी करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता रविवारीही पगार खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. Nach सेवा एनपीसीआयद्वारे चालविली जाते. याद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. होय, पगार देणे, भागधारकांना लाभांश देणे, व्याज देणे, पेन्शन हस्तांतरित करणे यांसारखे आणि याशिवाय दर महिन्याला वीज, टेलिफोन, पाण्याची बिले दिली जातात.

आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढणे झाले महाग

आयसीआयसीआय बँकेकडून रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेकबुक शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तुम्ही एका महिन्यात फक्त चारवेळाच बँक खात्यामधून पैसे काढू शकता. त्यापेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये द्यावे लागतील. तसेच एका महिन्यात केवळ एक लाख रुपयांची ट्रान्झेक्शन लिमीट ठेवण्यात आली आहे. यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

संबंधित बातम्या: 

1 ऑगस्टपासून बँकेशी संबंधित मोठे नियम बदलणार, नोकरदारांना सर्वाधिक फायदा

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, एटीएममध्ये जाण्याआधी जाणून घ्या नवा नियम

ICICI आणि SBI कडून कार्डलेस सुविधा सुरु, पैसे कसे काढणार?

ATM मधून बाहेर पडण्याअगोदर चेक करा बॅलन्स, ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बसतोय एवढा भुर्दंड!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.