राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांशेजारी उभारले जाणार पेट्रोल पंप, मिळणार ‘या’ खास सुविधा

| Updated on: Oct 26, 2021 | 10:18 AM

Petrol Pump | लोक महामार्गालगतच्या जागेवर अतिक्रमण करत आहेत. ढाबे उघडत आहेत. या पार्श्वभूमीवर लहान ढाबा मालकांना पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवानगी द्यावी. याठिकाणी पेट्रोल पंप आणि पाच ते दहा वाहने पार्क करण्याची परवानगी देण्यात येतील.

राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांशेजारी उभारले जाणार पेट्रोल पंप, मिळणार या खास सुविधा
महामार्गांवर ढाब्यांशेजारी उभारले जाणार पेट्रोलपंप
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या छोट्या ढाब्यांवर खाद्यपदार्थासोबतच पेट्रोल आणि डिझेल भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लहान ढाबा मालकांना राष्ट्रीय महामार्गालगत पेट्रोल पंप आणि शौचालये बांधण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर काम करण्यास त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. कोणीतरी त्यांना एक एसएमएस पाठवला होता ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की 200-300 किमीच्या रस्त्यावर एकही शौचालय नाही. या सगळ्याचा विचार करुन ढाब्यांवर पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

लोक महामार्गालगतच्या जागेवर अतिक्रमण करत आहेत. ढाबे उघडत आहेत. या पार्श्वभूमीवर लहान ढाबा मालकांना पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवानगी द्यावी. याठिकाणी पेट्रोल पंप आणि पाच ते दहा वाहने पार्क करण्याची परवानगी देण्यात येतील. मात्र, त्या मोबदल्यात याठिकाणी लोकांसाठी शौचालये उपलब्ध करुन द्यावी लागतील. हा प्रस्ताव सध्या मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात वाढ

केंद्रीय मंत्री म्हणाले की, त्यांच्या मंत्रालयाने सतत केलेल्या प्रगतीच्या देखरेखीमुळे रस्त्यांच्या बांधकामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लक्षणीयरीत्या वेगवान झाली आहे. रस्त्यांच्या बांधकामासाठी भूसंपादन करताना मोबदल्याची रक्कमही वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढावा’

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनचा पुरस्कार करताना आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला आहे. भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून नसलेला देश बनवण्याची गरज आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून मिळणारा पैसा अनेक देश दहशतवादाला आर्थिक मदत करण्यासाठी वापरत असल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ग्रीन हायड्रोजन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा उत्तम इंधन आहे. वाहतूक क्षेत्रात मोठा बदल होत आहे. ते म्हणाले, आम्हाला भारत असा देश बनवायचा आहे जो पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून नसून इंधन निर्यात करेल.

भारतात इंधनदरात प्रचंड वाढ, वाहनांच्या वापराचा पॅटर्न बदलणार

देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीतील गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका