आता मोबाईच्या मदतीने शिका देशातील 22 भाषा; टेस्ट पास केल्यास मिळणार प्रमाणपत्र

| Updated on: Dec 13, 2021 | 6:15 AM

भाषेचे ज्ञान वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे नाव भाषा संगम असे आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आपन देशातील विविध 22 भाषांचा अभ्यास करू शकतो. त्या लिहायला, वाचायला शिकू शकतो. 'एक भारत श्रेष्ठ भारत' सरकारच्या या महत्त्वकांक्षी अभियानाच्या पार्श्वभूमीवर या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

आता मोबाईच्या मदतीने शिका देशातील 22 भाषा; टेस्ट पास केल्यास मिळणार प्रमाणपत्र
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: भाषेचे ज्ञान वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे नाव भाषा संगम असे आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आपन देशातील विविध 22 भाषांचा अभ्यास करू शकतो. त्या लिहायला, वाचायला शिकू शकतो. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ सरकारच्या या महत्त्वकांक्षी अभियानाच्या पार्श्वभूमीवर या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हे अ‍ॅप पूर्णपणे मोफत असून, कोणताही व्यक्ती आपल्या मोबाईवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामध्ये समाविष्ट असलेली भाषा लिहायला वाचायला शिकू शकतो. या  अ‍ॅपमध्ये काही गेमचा देखील समावेश करण्यात आला आहे. हे गेम खेळता खेळता आपण आपल्याला हवी ती भाषा सहज आत्मसात करू शकतो.

इंटरनेटची आवश्यकता

हे अ‍ॅप पूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असेल तरच हे अ‍ॅप काम करेल. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही विविध भाषा शिकू शकता. या अ‍ॅपमध्ये एकूण 22 भाषांचा समावेश केला आहे. त्यापैकी तुम्हाला हवी ती भाषा तुम्ही शिकू शकता. या अ‍ॅपमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, कोंकणी, मलयाळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी संस्कृत सिंधी, तामिळ, तेलगू, ऊर्दू, बोडो, संथाली मैथिली अशा 22 भाषांचा समावेश आहे.

भाषासोबतच राज्यातील संस्कृतीचीही माहिती

हे अ‍ॅप भारताच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये काही बोली भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 22 भाषांपैकी तुम्ही कोणतीही भाषा लिहायला किंवा वाचायला शिकू शकता. या अ‍ॅपमध्ये केवळ भाषांचांच समावेश करण्यात आलेला नाही, तर त्या भाषांसोबतच त्या संबंधित राज्याच्या संस्कृतीचा देखील परिचय देण्यात आला आहे. त्यामुळे या अ‍ॅपवर आपल्याला विविध राज्यांची तिथे बोलण्यात येणाऱ्या भाषेची तसेत संस्कृतीची एकाच ठिकाणी ओळख होऊ शकते ते पण अगदी मोफत. दरम्यान तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून एखादी भाषा शिकला तर याच अ‍ॅपवर एक भाषा टेस्ट नावाचा पर्याय देखील देण्यात आला आहे. तुम्हाला संबंधित भाषा कुठपर्यंत येते. हे तुम्ही भाषा टेस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. तसेच त्या आधारावर ऑनलाईन भाषा प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देखील डाऊनलोड करू शकता.

 

संबंधित बातम्या

बँकिंग क्षेत्रातील नव्या धोरणांचा ठेवीदारांना फायदा; अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे मिळाले परत, मोदींची बँक ठेवी विमा कार्यक्रमात माहिती

क्रिप्टोच्या दरात तेजी; जाणून घ्या प्रमुख करन्सींचे दर

कोरोनामुळे झालेले नुकसान वेगाने भरून काढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश; अर्थ मंत्रालयाकडून अहवाल सादर