Aadhaar Card : मोठी अपडेट! कोट्यवधी आधार कार्डधारकांना मोठा झटका, UIDAI ने केली ही घोषणा

| Updated on: Mar 11, 2023 | 8:15 PM

Aadhaar Card : आधार कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने, UIDAI ने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, आधारमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात येतात. परंतु, याविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

Aadhaar Card : मोठी अपडेट! कोट्यवधी आधार कार्डधारकांना मोठा झटका, UIDAI ने केली ही घोषणा
Follow us on

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhar card)आता प्रत्येक ठिकाणी आवश्यक ओळखपत्र झाले आहेत. अनेक ठिकाणी त्याचा वापर करण्यात येतो. तर बँकेत, शेअर बाजारात, म्युच्युअल फंडात आधार कार्डशिवाय तुम्हाला खाते उघडता येते नाही. पण आधार कार्ड तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही चुकीची माहिती दिली. नावाचे चुकीचे स्पेलिंग टाकल्यास पुढे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला नंतर त्यात दुरुस्त करणे डोकेदुखी ठरते. आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, लिंग इत्यादी माहिती अपडेट करता येते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यासंबंधीची सुविधा देते. पण तुम्हाला ही माहिती कितीवेळा दुरुस्त करता येते? की सातत्याने तुम्ही चुका कराल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला दिलासा मिळेल, असे होते का?

तर तुम्हाला असे वाटत असेल की आधार कार्डमध्ये कितीही वेळा माहिती अपडेट करता येते, तर ही गोष्ट खरी नाही. याविषयी युआयडीएआयने एक नियम तयार केला आहे. त्यानुसार, एका मर्यादेपेक्षा आता तुम्हाला माहिती अद्ययावत करता येते नाही. तुम्ही वारंवार माहिती अपडेट करु शकत नाही. या नियमाला अपवाद सुद्धा आहे. पण त्याची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड इतर कागदपत्रांपेक्षा वेगळे आहे. यामुळे तुम्हाला एक राष्ट्रीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचा वापर करुन सरकार तुमच्याविषयीची आणि तुमच्या कार्यप्रणालीविषयीची माहिती मिळवू शकते. तसेच त्याचा वापर करुन तुम्हाला अनेक ठिकाणी तुमचे कार्यही साधता येते. हे कार्ड बायोमॅट्रिकवर आधारीत आहे. त्यामुळे हे कार्ड तयार करताना योग्य माहिती भरणे आवश्यक आहे. तुम्ही वारंवार माहिती अद्ययावत करु शकत नाहीत.

हे सुद्धा वाचा
  1. आता भारतीय नागरिकाला केवळ 2 वेळा त्याच्या नावात बदल करता येणार आहे.
  2. जर तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एखादी चूक झाली असेल.
  3. लग्नानंतर तुम्हाला नावात, आडनावात बदल करायचा असेल तर हा बदल करता येतो.
  4. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  5. आधार कार्डमध्ये लिंग, जेंडरविषयी माहिती बदल करता येते.
  6. पण चुकीची दुरुस्ती केवळ एकदाच करता येते. त्यामुळे माहिती भरताना काळजी घ्या.
  7. आधार कार्डमध्ये जन्मतारखेत चूक झाली असल्यास नागरिकांना ती सुधारता येते.
  8. पण ही चूक एकदाच दुरुस्त करता येते. त्यासाठी वारंवार संधी देण्यात येत नाही.
  9. घराचा पत्ता, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, फोटो, फिंगर प्रिंट, रेटिना स्कॅनिंग याविषयी नियम वेगळे आहेत.
  10. तुम्हाला या बाबी कितीही वेळा बदलता येतात. त्यात दुरुस्ती करता येते.