NPS खात्यात घरबसल्या जमा करा रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

| Updated on: Apr 27, 2022 | 1:23 PM

राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीच्या माध्यमातून आयुष्याच्या उतरणीला निवृत्ती निधी उभारता येईल.योजनेत सेवानिवृत्ती निधी जमा करणे आणि करबचत करणे असा दुहेरी फायदा होतो.

NPS खात्यात घरबसल्या जमा करा रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...
NPS खात्यात घर बसल्या जमा करा रक्कम
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय निवृत्ती प्रणालीच्या (National Pension System- NPS) माध्यमातूनआयुष्याच्या उतरणीला निवृत्ती निधी उभारता येईल. हे एक सोळा आणे गुंतवणुकीसाठी योग्य साधन आहे. यामध्ये रक्कम जमा करून मोठ्या प्रमाणात पैसा उभारता येतो. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी क्षेत्रातील कर्मचारी एनपीएस(NPS)मध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत सेवानिवृत्ती निधी उभारणे आणि करबचत (Tax Saving) करणे असा दुहेरी फायदा होतो. NPSचे सेवानिवृत्ती निधी सदस्य तयार करण्यासाठी टियर I (PENSION) आणि टियर ||  खाते उघडू शकतो. NPS कलम 80सीसीडी (1) अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत आणि कलम 80 सीसी अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत (80 सी पेक्षा जास्त लाभ) कर लाभ (Tax Benefit) मिळतो.ओटीपी पडताळणीनंतर टियर I किंवा टियर II खात्यात योगदान देता येईल

मोबाइलवर उघडा खाते

मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि नेट बँकिंग सुविधेसह सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदाराने पॅन नंबरसह वैयक्तिक पेन्शन खाते उघडण्याचा निर्णय घेतल्यास, त्यासाठी PRAN सक्रिय असणे आवश्यक आहे. एनपीएस खाते घरी बसून जमा करता येते. जाणून घेऊयात त्याबद्दल सर्वकाही

e-NPS-ग्राहक ऑनलाइन योगदान देण्यासाठी https://enps भेट देता येईल. nsdl.com आणि योगदान टॅबवर क्लिक करा. सब्सक्रायबरचा PRAN (Permanent Retirement Account Number ) क्रमांक टाका आणि जन्मतारीख दाखल करा. ओटीपी पडताळणीनंतर टियर I किंवा टियर II खात्यात योगदान देता येईल

मोबाइल अॅप – मोबाइलमधुन एनपीएस खात्यात

योगदान जमा करता येईल. एनपीएस मोबाईल अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करा. अॅपमध्ये लॉग इन न करता केवळ PRAN आणि जन्मतारीख टाकून नंतर ‘Verify PRAN’वर क्लिक करूनही योगदान देता येईल. ओटीपी ऑथेंटिकेशननंतर, ग्राहक नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खात्यात योगदान देऊ शकता.

नोडल ऑफिस- कोणीही पीओपी-एसपी (POP-SP) लोकेशनवर जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करू शकतो. एखादी व्यक्ती http://bit.ly/2ICLtax एनपीएस योगदान स्लिप डाउनलोड करू शकते आणि ती भरल्यानंतर POP-SP कडे सबमिट करू शकते. योगदानाची माहिती असावी यासाठी पावती दिली जाते.

योगदानाच्या 0.1 टक्के पीओपी सेवा शुल्क (10 ते 10,000 रुपयांदरम्यान) लागू होईल. आधारद्वारे ई-एनपीएस (eNPS)मध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांच्या बाबतीत भविष्यातील योगदानासाठी कोणतेही शुल्क लागू नाही. eNPSच्या माध्यमातून दिलेले योगदान टी +२ आधारावर ग्राहकांच्या एनपीएस खात्यात जमा केले जाते. टियर I खात्यासाठी किमान अंशदानाची रक्कम रु.500 आणि टियर |I खात्यासाठी किमान 250 रुपये अंशदान जमा करावे लागेल.