AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good News : सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा, सरकारी कंपन्या देणार सुखद धक्का?

Good News : सर्वसामान्यांना लकरच मोठा दिलासा मिळणार आहे..काय आहे ही बातमी..

Good News : सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा, सरकारी कंपन्या देणार सुखद धक्का?
लवकरच दिलासा
| Updated on: Nov 01, 2022 | 3:20 PM
Share

नवी दिल्ली : व्यावसायिक गॅसच्या (Commercial Gas) दरात पुन्हा कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेलिंग आता स्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. घरगुती गॅसच्या (Domestic LPG) किंमती कमी न झाल्याने सर्वसामान्य (Common Man) नाराज झाला आहे. पण त्याला लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात हा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदलण्याचा विषय समोर येतो. यामहिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 40 पैसे प्रति लिटर कपातीचा निर्णय होण्याची बातमी आली आहे.

विशेष म्हणजे ही कपात एकदाच नाही तर तीन वेळा होण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. अर्थात तेल कंपन्या अथवा सरकार यांच्यापैकी कोणीही याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही. आज सकाळी ईंधनाच्या दरात कसलीही कपात झालेली नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होऊ शकते. तसेच अनेक दिवसांपासून भाव स्थिर असल्याचा फायदा ही मिळू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून आंतर राष्ट्रीय स्तरावर 95 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहे.

आंतररराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल सातत्याने खालच्या पातळीवर आहे. 95 डॉलर प्रति बॅरलच्या खाली या किंमती टिकून आहेत. मध्यंतरी दोन-तीन वेळा काही काळासाठी किंमती वाढल्या होत्या. पण हा बदल जास्त दिवस टिकला नाही.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 115 रुपयांची घसरण झाली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात काहीच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक गॅसच्या किंमतीत घसरण झाल्याने एलपीजीत ही 7 व्यांदा कपात करण्यात आली आहे.

या कपातीमुळे 19 किलोच्या सिलेंडरमागे 610 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे दिल्लीत आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1,859 रुपयांऐवजी आता 1,744 रुपये मोजावे लागत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.