AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: 12 दिवसांत पेट्रोलची किंमत अवघ्या 30 पैशांनी घटली, जाणून घ्या आजचा भाव

Petrol and Diesel | पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

Petrol Diesel Price: 12 दिवसांत पेट्रोलची किंमत अवघ्या 30 पैशांनी घटली, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-़डिझेल
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई: इंधन दरवाढीमुळे धास्तावलेले सामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कधी घट होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, आता सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही. रविवारी देशात सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 5 सप्टेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली होती. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या 12 दिवसांमध्ये इंधनाच्या दरात अवघ्या 30 पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होऊन महागाई आटोक्यात येण्याच्या सामान्यांच्या आशा पार धुळीस मिळाल्या आहेत. (Petrol and Diesel rates in country Today)

पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इंधनाचे दर वाढल्याने मोदी सरकारची चांदी

देशभरात इंधन दरवाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, हा काळ केंद्र सरकारसाठी सुगीचा ठरताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांमध्येच इंधनावरील अबकारी करातून (Excise Duty) मिळणाऱ्या महसूलात तब्बल 48 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.

संबंधित बातम्या:

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

Fuel Price Hike: केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला नाही, मग 32 रुपयांची दरवाढ कशी झाली?

(Petrol and Diesel rates in country Today)

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.