Petrol Diesel Price Today: डिझेल दरवाढीला ब्रेक, सामान्यांना तुर्तास दिलास, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

| Updated on: Sep 29, 2021 | 10:14 AM

Petrol and Diesel | चार दिवसांमध्ये डिझेलचे दर तीनवेळा वाढले होते. त्यामुळे डिझेल एकूण 70 पैशांनी महागले होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 24 सप्टेंबरला डिझेलच्या दरात 20 पैसे, 26 सप्टेंबरला 25 पैसे आणि सोमवारी25 पैशांची वाढ केली होती. तुर्तास पेट्रोलची किंमत स्थिर आहे.

Petrol Diesel Price Today: डिझेल दरवाढीला ब्रेक, सामान्यांना तुर्तास दिलास, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
पेट्रोल
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मात्र, तुर्तास डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने सामान्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.47 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 97.21 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.39 आणि 89.57 रुपये इतका आहे.

चार दिवसांत डिझेल 70 पैशांनी महागले

चार दिवसांमध्ये डिझेलचे दर तीनवेळा वाढले होते. त्यामुळे डिझेल एकूण 70 पैशांनी महागले होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 24 सप्टेंबरला डिझेलच्या दरात 20 पैसे, 26 सप्टेंबरला 25 पैसे आणि सोमवारी25 पैशांची वाढ केली होती. तुर्तास पेट्रोलची किंमत स्थिर आहे.

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत भारतात मोठी इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीने 2018 नंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 80 डॉलर्स इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करणे अटळ मानले जात आहे.

जगभरात लॉकडाऊनचे निर्बंध हटल्यानंतर अनेक देशांमध्ये दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे वाहने पुन्हा मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे इंधनाच्या पर्यायाने कच्च्या तेलाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही काळात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने सध्या बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वरच्या दिशेने प्रवास करत आहेत.
गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस ब्रेंट क्रूडची किंमत $ 90 ला स्पर्श करू शकते. जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा जोर ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहारांना वेग आला आहे. त्यामुळे तेलाची मागणी झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत नुकत्याच आलेल्या चक्रीवादळ इडाच्या विनाशामुळे तेलाच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनानंतर कच्च्या तेलाच्या मागणीत इतक्या झपाट्याने वाढ होईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. आगामी काळात कच्च्या तेलाचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…