AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या इंधनाचा आजचा दर

Petrol price | पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.80 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.75 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.94 आणि 96.67 रुपये इतका आहे.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या इंधनाचा आजचा दर
पेट्रोल-डिझेल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 27, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई: अवघ्या दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. त्यानुसार पेट्रोल प्रतिलीटर 35 पैसे तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मात्र, यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीचा प्रवास पुन्हा एकदा वरच्या दिशेने सुरु झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबरला देशभरात इंधनाचे दर स्थिर होते.

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.80 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.75 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.94 आणि 96.67 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही.

भारतात इंधनदरात प्रचंड वाढ

देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांशेजारी उभारले जाणार पेट्रोल पंप, मिळणार ‘या’ खास सुविधा

Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी