असंघटित कामगारांना द्या पेन्शनचे ‘गिफ्ट’!, कामगार, ड्रायव्हरसाठी डोनेट ए पेन्शन योजना, सरकारचे सामाजिक दायित्वासाठी भरभक्कम पाऊल

डोनेट ए पेन्शन या योजनेतंर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना उतारवयात आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील कामगारांना त्यांच्या वयाच्या आधारे दरवर्षी 660 ते 2 हजार 400 रुपये जमा करता येतील. 60 वर्षानंतर त्यांना 3 हजार रुपये प्रति महिना मिळेल.

असंघटित कामगारांना द्या पेन्शनचे 'गिफ्ट'!, कामगार, ड्रायव्हरसाठी डोनेट ए पेन्शन योजना, सरकारचे सामाजिक दायित्वासाठी भरभक्कम पाऊल
Image Credit source: ABP NEWS
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:40 AM

मुंबई : आता घरगुती कामगार, मजूर, टॅक्सी ड्रायव्हर यांना हक्काची पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने यासाठी पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांचे (UnOrganized Labour) कष्टमय जीवन उतारवयात थोडे सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी तुम्हाला ही खारीचा वाटा उचलता येईल. घरगुती नोकर, ड्रायव्हर अथवा असंघटित श्रमिकांसाठी तुम्ही पेन्शनचे गिफ्ट देऊ शकता. त्यांच्या पेन्शनसाठी राशी जमा करण्यासाठी तुम्ही योगदान देऊ शकता. केंद्र सरकारने या अनोख्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या योजनेला सोमवारपासून सुरुवात केली आहे. आता तुमचे एक पाऊल उत्तारवयात कोणाचे तरी आयुष्य सुखद करु शकते हे नक्की केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी याविषयीच्या योजनेची घोषणा केली. सोमवारी पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maan-Dhan Scheme) अंतर्गत डोनेट ए पेन्शन (Donate-a-Pension) कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 7 मार्च रोजी सुरु करण्यात आलेला हा कार्यक्रम 13 मार्चपर्यंत सुरु राहील. यादव यांनी ट्विटरवर या योजनेची माहिती दिली आहे. त्यानुसार, नागरिकांना सामाजिक उत्तरदायित्वाच्या या यज्ञात सहभागी होता येईल. घरगुती कामगार, ड्रायव्हर, नोकर यांच्यासहित अन्य श्रमजीवींसाठीच्या पेन्शन योजनेचा प्रिमियम भरता येईल. सोमवारी डोनेट ए-पेन्शन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.त्यातून कष्टकरी लोकांचे उर्वरीत आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

असे देता येईल योगदान

तुम्ही ही ओळखीच्या अथवा घर कामाला येणा-या कामगारासाठी, ड्रायव्हरसाठी पेन्शन योजनेत लाभ देऊ इच्छित असाल, त्यांच्या पेन्शनचा प्रिमियम भरु इच्छित असाल तर तुम्हाला PM-SYM खाते उघडावे लागेल. सरकारी सेवा पुरवणा-या ई-सेवा केंद्रावर तुम्हाला असे खाते उघडता येईल. त्यासाठी आधारकार्ड आणि बँकेचे पासबूक आवश्यक असेल. त्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड देण्यात येईल. त्याद्वारे तुम्ही योगदान देऊ शकता.

आइकॉनिक वीक

श्रम मंत्रालय आइकॉनिक वीक साजरा करत आहे. यामध्ये ई-श्रम अंतर्गत 25 कोटींची नोंदणी, उमंग अॅपवर ई-श्रम योजनेचा शुभारंग, डोनेट ए पेन्शन योजनेची सुरुवात, राष्ट्रीय करियर सेवा केंद्राद्वारे नोकरी मेळावा, प्लेसमेंट ड्राईव्ह आणि यासंबंधीच्या शिबिरांचे आयोजना यांचा समावेश आहे. देशात श्रम मंत्रालयातंर्गत 20 क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे. तसेच कामगारांना त्यांचे हक्क, अधिकार आणि कायदे यांची माहिती देऊन त्यांना जागरुक करण्यात येत आहे.

सामाजिक सुरक्षेसाठी पोर्टल

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ई-श्रम पोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. देशात पहिल्यांदाच यामार्फत 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचा ड्राईव्ह घेण्यात आला. त्यासाठी एक प्रणाली आखण्यात आली. सरकार या पोर्टलवर श्रमिकांची केवळ नोंदणीच करणार नाही. तर केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणा-या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ ही देण्यात येणार आहे. eSHRAM पोर्टलवर प्रत्येक नोंदणीकृत सदस्याला 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा त्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये मिळतील.

इतर बातम्या

नोकरी बदलतेवेळी पीएफचं काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

ऑनलाइन शिक्षणासाठी सरकार देत आहे 3 महिन्याचे फ्री मध्ये रिचार्ज, जाणून घेऊया व्हायरल मॅसेज मागील ट्रूथ फॅक्ट!

Jhund Video: अच्छा फिल्ममेकर नहीं, पागल भी है, नीडर भी, नागराजच्या प्रेमात अनुराग कश्यप जेव्हा हसतो-रडतो…

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.