रिझर्व्ह बँकेकडे नाण्यांचा ढीग, ग्राहकांना नाणी द्या आणि इंन्सेन्स्टिव मिळवा, बँकांना खास ऑफर

Reserve Bank | रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, बँकांना ग्रामीण भाग आणि खेड्यांमध्ये नाणी वितरीत करण्यासाठी 10 रुपयांचा अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता मिळेल. बँकांनी ग्राहकांना नाण्यांचा व्यवस्थित पुरवठा करावा, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेकडे नाण्यांचा ढीग, ग्राहकांना नाणी द्या आणि इंन्सेन्स्टिव मिळवा, बँकांना खास ऑफर
रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलनातील नाणी मोठ्याप्रमाणावर पडून असल्यामुळे ही नाणी बँकांमधून वितरीत करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच बँकांमध्ये पैसे काढायला गेलेल्या ग्राहकांच्या हातात नोटांऐवजी नाण्यांची चळत पडण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नाणी वितरीत करण्यासाठी बँकांना वाढीव प्रोत्साहनपर भत्ता ( Incentive) दिला जाणार आहे. नाण्यांच्या एका थैलीसाठीचा इंन्सेन्टिव्ह 25 रुपयांवरुन 65 रुपये इतका करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे, बँकांना ग्रामीण भाग आणि खेड्यांमध्ये नाणी वितरीत करण्यासाठी 10 रुपयांचा अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता मिळेल. बँकांनी ग्राहकांना नाण्यांचा व्यवस्थित पुरवठा करावा, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

घरोघरी बँक

रिझर्व्ह बँकेकडून बँकेकडून ग्राहकांना डोअरस्टेप सुविधा पुरवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहकांच्या घरी किंवा कार्यालयापर्यंत बँकांनी सुविधा द्याव्यात. त्यासाठी संबंधित ग्राहकाने केवळ केवायसीची पूर्तता केली असणे गरजेचे आहे.

20 रुपयांचं नवं नाणं

रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात 20 रुपयांचे नवे नाणे चलनात आणले होते. या नाण्याची बनावट इतर नाण्यांपेक्षा भिन्न होती. या नाण्यावर कृषीप्रधान भारताची झलक दिसते. हे नाणे तयार करण्यासाठी तांबे आणि निकेल या धातूंचा वापर करण्यात आला आहे. अंध व्यक्तीही हाताच्या स्पर्शाने हे नाणे ओळखू शकतात, अशी नाण्याची बनावट आहे.


संबंधित बातम्या:

जुनी नाणी किंवा नोटा विकण्यापूर्वी सावधान, RBI कडून महत्त्वाची सूचना जारी

30 ऑगस्टपासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या किंमत

ITR Filing- करदात्यांना दिलासा! सरकार ITR भरण्याची तारीख वाढवण्याच्या तयारीत, कारण काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI