विजेचे बील होईल अर्ध्याहून कमी ; या 3 गोष्टींचा वापर करा आजच बंद !

| Updated on: Aug 06, 2022 | 12:21 PM

महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त झालेली असतानाच आता वीजेच्या भरमजसाठ बिलामुळेही लोकांचे बजेट बिघडलेले आहे. टीव्ही, फ्रीज, एसी, गिझर यांच्या वापरामुळ वीजेच बील खूप जास्त येते. ते कमी करायचे असेल तर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर बंद करावा.

विजेचे बील होईल अर्ध्याहून कमी ; या 3 गोष्टींचा वापर करा आजच बंद !
Follow us on

Electricity Saving Tips: महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त झालेली असतानाच आता वीजेच्या भरमजसाठ बिलामुळेही (Increasing electricity bill)लोकांचे बजेट बिघडलेले आहे. वीजेचे बील कमी यावे अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, गिझर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या (Electronic devices) सततच्या वापरामुळे (consumes more electricity) ते कमी होताना दिसत नाही. वीजेचे बील कमी येऊन, खर्चाचे बजेट कोलमडू नये, असे वाटत असेल तर काही उपाय करणे गरजेचे आहे. अनावश्यक वीज वापर टाळावा, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना दिवे-पंख त्वरित बंद करावेत, दिवसा गरज नसेल तर दिव्यांचा वापर टाळावा, ज्यांची खरोखरच गरज आहे ते सोडून इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे काढून वीज वाचवता येऊ शकते. परिणामी तुमचे वीजेचे बीलही आपोआप कमी होईल.

वीजेचे बील कसे करावे कमी ?

किचनमधील चिमणी हटवावी –

बऱ्याच घरात हल्ली किचनमध्ये चिमणी बसवलेली दिसते. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की सर्वात जास्त वीज या चिमणीसाठीच वापरली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात घामाच्या धारा वाहत असताना किचनमध्ये काम करणे अतिशय कठीण असते. तेव्हा या चिमणीचा वापर अनिवार्य असतो. मात्र त्यात घाबरण्यासारखे काही नाही. चिमणीऐवजी तुम्ही इतर उपकरणांचा वापरही करू शकता. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात. किचनमध्ये चिमणी ऐवजी एक्झॉस्ट फॅनचा वापर करू शकता. तसेच किचनच्या खिडक्या उघड्या ठेवल्यानेही धूर साचून रहात नाही, मोकळी हवा फिरती राहते. त्यामुळे किचनमधील चिमणी काढून तुम्ही वीजेचे बील कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता.

हे सुद्धा वाचा

गीझर-

बाथरुममधील गरम पाण्याच्या गीझरमुळेही खूप वीज खर्च होते. त्यामुळे याबाबतीतही तुम्ही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. वीजेवर चालणारा गीझर तुमचे बिल आणखी वाढवू शकतो. त्यामुळे दुसरा एखादा पर्याय शोधणे महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी गॅस गीझर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. वीजवेर चालणाऱ्या गीझरऐवजी गॅस गीझरचा वापर केल्यास वीजेचा वापरही कमी होईल आणि बीलही वाढण्याची चिंता राहणार नाही.

इन्व्हर्टर एसी (Inverter AC) –

वीजेचा सर्वात जास्त वापर हा एअर कंडीशन अर्थात एसी लावल्यावर होतो, हे सर्वांनाच माहीत असेल. मात्र ही एक अशी वस्तू आहे, ज्याची सगळ्यांनाच सवय झाली आहे, त्यामुळे तो घरातून काढून टाकणे तर शक्य नाही. मात्र वीज वाचवायची असेल तर काहीतरी उपाय शोधणेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही Non-Inverter AC च्या जागी Inverter AC चा वापर करू शकता. Inverter AC चा सरळ अर्थ , की हा एसी वीज वाचवण्यासाठी सर्वोत्तम ठरतो. याच्या बाहेरच्या भागात PCB लावण्यात आलेला असतो, ज्यामुळे कॉंप्रेसरचा वेग नियंत्रणात राहतो. Inverter AC मुळे 15 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत होऊ शकते, असा दावा कंपनीतर्फे करण्यात येतो.