AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा आपल्यात नाहीत हे सुनेत्रा पवार मानायलाच तयार नव्हत्या, अखेर त्यांना कधी विश्वास बसला? जे घडलय ते…

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनाच्या धक्क्यातून राज्य अद्यापही सावरलेलं नाही. तर पवार कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजितदादा यांच्या निधनानंतर ते आपल्यात नाहीत... हे सत्य मानायलाच सुनेत्रा पवार तयार नव्हत्या... त्यादिवशी नक्की काय झालेलं घ्या जाणून...

अजितदादा आपल्यात नाहीत हे सुनेत्रा पवार मानायलाच तयार नव्हत्या, अखेर त्यांना कधी विश्वास बसला? जे घडलय ते...
Sunetra Pawar
| Updated on: Feb 04, 2026 | 11:24 AM
Share

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. 28 जानेवरी 2026 रोजी सकाळी बातमी आली, अजित पवार यांचं विमान अपघातात निधन… त्यानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अदितदादा आता आपल्यात नाहीत, हे सत्य मानायलाच तयार नव्हत्या. अजित पवार यांच्या निधानाची बातमी समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसलेला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे, ही बातमी सांगण्यासाठी जेव्हा सुनेत्रा पवार यांना फोन आलेला, तेव्हा त्या मानायलाच तयार नव्हत्या…

विमान अपघाताचा फोन आल्यानंतर, काही मिनिटांनंतर ज्याठिकाणी अपघात झाला, तेथून सुनेत्रा पवार यांनी व्हिडीओ कॉल करण्यात आला. ज्यामध्ये ज्यामध्ये जळत्या विमानाचे अवशेष स्पष्ट दिसत होते. ते दृश्य पाहिल्यानंतर सुनेत्रा पवार पूर्णपणे कोलमडल्या… त्यांच्यासाठी ती सकाळ काळी सकाळ ठरली… तेव्हा सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या आणि घडलेल्या घटनेनंतर त्यांनी तात्काळ बारामती येथे जाण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन

बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता, जेव्हा अजित पवार मुंबईहून बारामती येथे येत होते, तेव्हा लँडिंग करताना विमान अनियंत्रित झाला आणि धावपट्टीजवळ असलेल्या शेतात पडला. विमान शेतात कोसळल्यानंतर चार ते पास स्फोट झाले आणि सर्वत्र आगीचे लोट पसरले… या अपघातात महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं… कारण राज्याने कामाचा माणूस गमावला…

विमान अपघातात अजित पवार यांच्यासह, खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडेंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को – पायलट शांभवी पाठक होत्या. या सर्वांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य अद्यापही मोठ्या धक्क्यातून सावरलेलं नाही.

पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणातील हलचालींनी वेग घेतला. बुधवारी दादांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले… त्यानंतर शनिवारी म्हणजे 31 जानेवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी