AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आयटी कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना केले मालामाल; एका वर्षात 200 टक्के रिटर्न्स

Share Market | सध्या शेअर बाजारात अशाच एका आयटी कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे. बंगळुरूस्थित Persistent  Systems कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदरांना तब्बल 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

या आयटी कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना केले मालामाल; एका वर्षात 200 टक्के रिटर्न्स
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 16, 2021 | 10:49 AM
Share

मुंबई: कोरोना काळात आयटी कंपन्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दीड वर्षात अनेक आयटी कंपन्यांच्या नफा कित्येक पटींनी वाढला आहे. साहजिकच यामुळे या कंपन्यांचे भांडवली बाजारातील मूल्यही तितकेच वाढले आहे. त्यामुळे भांडवली बाजारात आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळताना दिसत आहे.

सध्या शेअर बाजारात अशाच एका आयटी कंपनीची जोरदार चर्चा सुरु आहे. Persistent  Systems कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदरांना तब्बल 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात Persistent  Systems च्या एका समभागाची किंमत 1166 रुपये इतकी होती. मात्र, वर्षभरानंतर या कंपनीच्या समभागाने 3652 रुपयांची पातळी गाठली आहे. याचा अर्थ या कंपनीने अवघ्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

पर्सिस्टंट कंपनीच्या शेअरमध्ये आता गुंतवणूक करावी का?

कोरोना काळात इतर माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणे (आयटी) Persistent  Systems च्या महसूलात वाढ झाली आहे. त्यावरुन कंपनीची सेवा आणि नेतृत्त्व चांगले असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी ऑर्गेनिक रेवेन्यू ग्रोथमध्ये Persistent  Systems इतर आयटी कंपन्यांपेक्षा पुढे जाईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तसेच कंपनीचा नफा वाढत राहिल्यास समभागांच्या किंमतीमध्येही तेजी राहील, असे सांगितले जात आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल