AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या हत्त्येनंतर चर्चेत असलेले MDMA ड्रग्स नेमके आहे तरी काय?

MDMA ड्रग्सचा वापर (Use) नेमका कशासाठी होतो? त्याचा फुल फॉर्म (Full Form) काय? त्याचे धोके कोणते? याचा नशा कसा असतो? असे अनेक प्रश्न नक्कीच पडले असतील. या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या हत्त्येनंतर चर्चेत असलेले MDMA ड्रग्स नेमके आहे तरी काय?
मुंबई आणि गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाईImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 27, 2022 | 2:26 PM
Share

सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) मृत्यूप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सोनाली फोगटला दीड ग्रॅम MDMA ड्रग्स (Drugs) दिल्याची कबुली दिली आहे. एखाद्या सेलिब्रिटीला MDMA ड्रग्स दिल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतलाही हेच  ड्रग्स दिल्याची चर्चा झाली होती. याशिवाय हे  ड्रग्स जप्त करण्याच्या अनेक घटनाही वारंवार समोर येतात. फोगट यांच्या मृत्यूनंतर हे ड्रग्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. MDMA ड्रग्सचा वापर (Use) नेमका कशासाठी होतो? त्याचा फुल फॉर्म (Full Form) काय? त्याचे धोके कोणते? याचा नशा कसा असतो? असे अनेक प्रश्न नक्कीच पडले असतील. या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

MDMA ड्रग्स नेमके काय आहे?

3, 4 methylenedioxy- methamphetamine मेथिलीनडियोक्सी- मेथाएफेटामाइन हे MDMA हे या ड्रग्सचे पूर्ण नाव आहे.  मॉली, एक्स्टेसी, एक्सटीसी या इतर नावांनी देखील हे ड्रग्स ओळखले जाते. ते घेतल्यानंतर, त्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर 35 ते 45 मिनिटांत दिसू लागतो. हे टॅब्लेट किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतले जाते. एखाद्या व्यक्तीला त्याचे व्यसन लागेल की नाही हे तो किती प्रमाणात घेत आहे यावर अवलंबून आहे. दीर्घकाळ घेतल्यावर त्याचे व्यसन लागते हे निश्चित.

ड्रग्स घेतल्यानंतर त्याचा काय प्रभाव होतो?

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अ‍ॅब्यूजच्या अहवालानुसार, हे औषध एक प्रकारचे उत्तेजक आहे जे व्यक्तीचा मूड बदलते. हे मेंदूमधून बाहेर पडणारे अनेक हार्मोन्स आणि रसायने वाढवते. परिणामी, व्यक्तीमध्ये असे अनेक बदल होतात. त्याचा प्रभाव संपल्यानंतर दुष्परिणाम देखील दिसू लागतात.

MDMA हे एक सायकोएक्टिव्ह कंपाऊंड आहे, जे घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला स्वतःला उर्जेने भरलेले वाटते. तो स्वतःला आनंदी अनुभव करतो.  त्याला थकवा जाणवत नाही. त्याची विचारसरणी बदलू लागते. रक्तदाब वाढू लागतो आणि हृदयाचे ठोकेही वाढू लागतात.

साईड इफेक्ट काय आहेत?

या ड्रग्सच्या प्रभावात असताना आपण काय करतोय काय वागतोय याचे कुठलेच भान नसते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास  त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. या ड्रग्सचे दीर्घकाळ सेवन केल्यास यकृत, मूत्रपिंड आणि हृदय निकामी होऊ शकते. त्यामुळे शरीराच्या इतर अनेक भागांवरही त्याचा परिणाम होतो. रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. या औषधाचा प्रभाव सहसा 3 ते 6 तासांपर्यंत असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. ड्रग्सचा  प्रभाव कमी झाल्यानंतर काही दुष्परिणाम आठवडाभर देखील दिसून येतात. उदाहरणार्थ, नैराश्य, पुन्हा ड्रग्स घ्यायची इच्छा, अनिद्रा, राग येणे, कशावरही लक्ष केंद्रित न करणे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...