AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ बँका देतायेत Savings Account वर सर्वोत्तम व्याजदर; आजच आपले खाते ओपन करा

आज आपण अशा बँकांची माहिती घेणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर (Bank Savings Account) सर्वोत्तम व्याज दर देत आहेत. प्रत्येक वर्षी जवळपास सर्वच बँका या आपल्या व्याजदरात बदल करत असतात.

'या' बँका देतायेत Savings Account वर सर्वोत्तम व्याजदर; आजच आपले खाते ओपन करा
सरकार तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा करत आहे ! सावध व्हा, तुमची फसवणूक होतेय....Image Credit source: TV9
| Updated on: Apr 10, 2022 | 9:31 PM
Share

आज आपण अशा बँकांची माहिती घेणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर (Bank Savings Account) सर्वोत्तम व्याज दर देत आहेत. प्रत्येक वर्षी जवळपास सर्वच बँका या आपल्या व्याजदरात बदल करत असतात. कोरोनाचा मोठा फटका हा बँकिंग क्षेत्राला देखील बसला आहे. त्यामुळे अनेक बँकांनी सध्य बचत खात्यावरील व्याज दरात घट केली आहे. तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार आपल्याला कोणत्या बँकेत सर्वोत्तम व्याजदर मिळेल याचा शोध घेत असतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा अनेक छोट्या बँका (Small banks) आहेत, की ज्या मोठ्या बँकांपेक्षा बचत खात्यावर चांगले व्याज देतात. या बँका बचत खात्यावर चार ते पाच टक्क्यांपर्यंत व्याज देतात. अशा बँकांमध्ये पैसे ठेवण्यात काही प्रमाणात रिस्क असू शकते, मात्र अशा बँकेतून बचत खात्यावर मिळणारा परतावा देखील अधिक असतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या बँकेमध्ये बचत खाते उघडणे (Best Online Savings Account) तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

बचत खात्यावर चांगाला व्याजदर देणाऱ्या बँका

अनेक छोट्या बँका अशा आहेत की ज्या मोठ्या खासगी तसेच सरकारी बँकांपेक्षा अधिक व्याजदर देतात. ज्यामध्ये यस बँकेचा समावेश होतो. एस बँक आपल्या ग्रहाकांना बचत खात्यावर चार ते पाच टक्के टक्के दराने वार्षिक आधारावर कर्ज देत आहे. यानंतर नंबर लागतो तो इंडंस्लॅड बँकेचा, ही बँक आपल्या ग्राहकांना वार्षिक आधारावर चार टक्के दराने व्याज देते. मात्र या बँकेत तुम्हाला तुमच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स म्हणून कमीत कमी एक लाख रुपये ठेवावेच लागतात. याचप्रमाणे आयडीएफसी बँक 3. 5 टक्के, स्टॅडर्ड चार्टर्ड बँक 2.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते.

झिरो बॅलन्स खात्याची सुविधा

अ‍ॅक्सिस बँकेकडून आपल्या ग्राहकांना सध्या खास सुविधा देण्यात येत आहे. या सुविधेनुसार जो ग्राहक अ‍ॅक्सिस बँकेत आपले खाते ओपन करतो त्या ग्राहकाला बँकेकडून झिरो बॅलन्स खात्याची सुविधा मिळते. सोबतच बचत खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर 3-4 टक्के दराने व्याज मिळते. झिरो बॅलन्स खात्याची सुविधा मिळत असल्यामुळे ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहे. झिरो बॅलन्स खाते म्हणजे असे खाते असते, तुम्हाला बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तींचे सॅलरी खाते असते अशा लोकांना बँकांकडून झिरो बॅलन्सीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

संबंधित बातम्या

महागाईमुळे ‘या’ देशावर आली होती दहा लाखांची नोट छापण्याची वेळ, सध्या परिस्थिती नियंत्रणात

रिलायन्स कॅपिटलच्या ‘कर्ज निराकरण’ प्रक्रियेबाबत प्रशासन आणि कर्जदार यांच्यात मतभेद ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बीएमडब्ल्यूचं मिशन इंडिया : नवं आर्थिक वर्ष मोक्याचं, 24 नव्या गाड्याचं लाँचिंग

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.