AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Credit Card Tips: ऑनलाईन खरेदीसाठी हवंय क्रेडिट कार्ड; या चार गोष्टींवर द्या लक्ष

ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे. तर सर्वात अगोदर ग्राहकाला त्याच्या खर्चाचा आवाका लक्षात घ्यायला हवा. त्याआधारे बँकांकडून देण्यात येणा-या विविध क्रेडिट कार्ड आणि त्याच्या सेवांची माहिती घेऊन एक क्रेडिट कार्ड घेता येईल.

Credit Card Tips: ऑनलाईन खरेदीसाठी हवंय क्रेडिट कार्ड; या चार गोष्टींवर द्या लक्ष
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 10:47 AM
Share

क्रेडिट कार्ड द्वारे (Credit Card) ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणे ही आता एकदम सहज गोष्ट झाली आहे. पूर्वी क्रेडिट कार्ड हे श्रीमंतीचे लक्षण समजण्यात येत होते. पण आता युपीआय पेमेंटच्या (UPI Payment) काळात क्रेडिट कार्डसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. तरीही पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी क्रेडिट कार्ड हा भारतीयांसाठी एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. तसेच अनेक बँका या क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्सचा वर्षाव करत असतात. त्यामुळे खरेदीदाराला पाईंट्सच्या सहाय्याने एखादी गोष्ट सहज मिळते. तसेच त्यामुळे खिश्यावरचा ताण कमी होतो. वेळेची बचत होते. आता तर अनेक क्रेडिट कार्डवर कॉम्बो ऑफर(Offers) देण्यात येते. जर तुम्ही ही नवीन क्रेडिट कार्ड घेऊ इच्छित असाल तर आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) ग्राहकांसाठी (Customer) क्रेडिट कार्ड निवडण्याच्या काही खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्सच्या सहकार्याने तुम्ही एक चांगेल क्रेडिट कार्ड निवडू शकता. तुमची ऑनलाईन शॉपिंग अधिक फायदेशीर करु शकता. चला तर जाणून घेऊयात या टिप्स…

क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी तुमची खर्च करण्याची सवय आणि पद्धत या दोघांचा चांगला अभ्यास करा. तुम्ही खूप उधळे असाल तर हा सौदा तुम्हाला घाट्यात तर नेणार नाही ना, याचा विचार कराल. तुम्ही प्रवास करणे पसंत करत असाल तर ऑनलाईन बुकिंगसाठी फायदा होणारे क्रेडिट कार्ड वापरा. बिल भरण्यासाठी अथवा एखाद्या शॉपिग प्लॅटफॉर्मवरुन शॉपिंग करत असाल तर अशावेळी त्यावर सूट, सवलत देणारे क्रेडिट कार्ड खरेदी करणे हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. काही कार्ड हे पेट्रोल-डिझेलवर तुम्हाला चांगली ऑफर देतात. तर काही हॉटेलिंगसाठी उपयोगी ठरतात. तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डचे अनेक प्रकार उपलब्ध आहे. त्यातून तुम्हाला वेळेची बचत करता येते आणि परताव्यातून फायदाही मिळतो.

व्याजदर बघून मगच घ्या क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड निवडण्यासाठी अगोदर हे जाणून घ्या की, कार्डवर किती व्याज दर आकारण्यात येते. कित्येकवेळा तुम्ही बिलावर अत्यंत कमी रक्कम भरता आणि उर्वरीत रक्कमेवर बँक तगडे व्याज आकारते. जर बिलाच्या संपूर्ण रक्कमेला तुम्ही ईएमआयमध्ये रुपांतरीत केले तर या ईएमआयवर तुम्हाला व्याज द्यावे लागते. त्यामुळे असे क्रेडिट कार्ड निवडा जे कमी व्याजदर आकारेल. तसेच तुम्हाला रक्कम भरण्यासाठी अधिक कालावधी देणारे क्रेडिट कार्डचा पर्याय निवडा. त्यामुळे तुम्हाला रक्कम वापरता येईल आणि योग्य वेळी क्रेडिट कार्डचे बिल भरता येईल.

रिवॉर्ड तुमच्या फायद्याचा

क्रेडिट कार्ड निवडताना या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर मिळालेले रिवॉर्ड अत्यंत महत्वाचे असतात. प्रत्येक बँक त्यांच्या क्रेडिट कार्डवर अनेक ऑफरसोबतच रिवॉर्ड पॉईंट देते. त्याचा वापर इतर काही चीज-वस्तू खरेदीशाठी करता येतो. क्रेडिट कार्ड निवडताना रिवॉर्डचे हे गणित समजून घ्या. तसेच हेही समजून घ्या की रिवॉर्डचा वापर कुठे आणि केव्हा करता येईल. त्यामुळे या पाईंटसच्या आधारे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घेता येईल.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.