LIC Jeevan Akshay | रिटायरमेंटला गाठी हवा पैसा, मग जीवन अक्षय योजनेचा पर्याय हवाच

LIC Jeevan Akshay | रिटायरमेंटनंतर चिंतामुक्त जगायचे असेल तर एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत आतापासूनच गुंतवणूक करा. सुरक्षित भविष्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते.

LIC Jeevan Akshay | रिटायरमेंटला गाठी हवा पैसा, मग जीवन अक्षय योजनेचा पर्याय हवाच
रिटायरमेंटनंतरची सोयImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 4:52 PM

LIC Jeevan Akshay | रिटायरमेंटनंतर (Retirement) चिंतामुक्त जगायचे असेल तर एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत (LIC Jeevan Akshay) आतापासूनच गुंतवणूक करा. सुरक्षित भविष्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. भविष्य सुखकर करण्यासाठी अनेक जण धडपडतात. उशीरा नियोजन केल्याने वाढता खर्च आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ बसत नाही आणि मग उतारवयातही नाहक खस्ता खाव्या लागतात. रिटायरमेंटसाठी लवकरच गुंतवणूक करा. देशातील सर्वात मोठी आणि सरकारी मालकीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने अनेक योजना बाजारात उतरवल्या आहेत. आज निवृत्तीसाठी गुंतवणूक करणं हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. जीवन अक्षय (Jeevan Akshay) योजनेतंर्गत निवृत्तीनंतर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे या योजनेत एकरकमी गुंतवणूक करता येते. या पॉलिसीतील पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते.

कर्जही मिळवता येते

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडू शकता. पेन्शन व्यतिरिक्त या योजनेचे इतरही फायदे आहेत. गुंतवणूक करताच तुम्हाला पॉलिसी बाँड मिळतो, गुंतवणुकीनंतर पैशांची गरज असेल तर तीन महिन्यांच्या गुंतवणुकीनंतर कर्जासाठीही अर्ज करता येतो. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादेची माहिती देण्यात आलेली नाही.

एक लाखांची गुंतवणूक

जीवन अक्षय पॉलिसी ही सिंगल प्रीमियम नॉन लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग पॉलिसी आहे, गुंतवणूकदाराला पॉलिसीमध्ये किमान 1 लाख रुपये गुंतवावे लागतात. एक लाख रुपये एकरकमी जमा केल्यास वार्षिक 12 हजार रुपये पेन्शन मिळेल. 35 ते 85 वर्षे वयोगटातील नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीचा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि औषधांच्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. एलआयसीच्या इतर ही अनेक योजना आहे. पण ही योजना निवृत्तीनंतरच्या काळासाठी आहे.

हे सुद्धा वाचा

दरमहा पेन्शनसाठी निवडा पर्याय

या योजनेत 20,000 रुपये निवृत्ती वेतन मिळण्यासाठी तुम्हाला पर्याय निवडावा लागेल. एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये ग्राहकांना गुंतवणुकीचा आणि दरमहा रक्कम निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केवळ एक प्रीमियम जमा केल्यावर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळण्याचाही पर्याय आहे. दर महिन्याला पेन्शन घ्यायची असेल तर मासिक पर्याय स्वत:च निवडावा लागेल. दरमहा 20 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर या योजनेत 4 लाख 72 हजार रुपये एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.