AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

bank Safety Tips : सायबर गुन्हेगारांपासून ‘अशी’ करा तुमच्या बँकेतील पैशांची सुरक्षा, एक चुकही पडू शकते महागात

अनेकदा आपल्या एका चुकीमुळे आपले संपूर्ण बँक खाते रिकामे होऊ शकते. या चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

bank Safety Tips : सायबर गुन्हेगारांपासून 'अशी' करा तुमच्या बँकेतील पैशांची सुरक्षा, एक चुकही पडू शकते महागात
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 29, 2022 | 8:34 AM
Share

तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये (Savings Account) ठेवलेला पैसा हा सुरक्षीत असू शकतो. मात्र अनेकदा तुमच्या बचतीला सायबर गुन्हेगारांची (Bank Fraud) नजर लागू शकते. अनेकदा तुमच्या एका चुकीमुळे तुमचे संपूर्ण खाते रिकामे होऊ शकते. सध्या सायबर गुन्हेगारीमध्ये विशेष: बँकिंग क्षेत्रात याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितामध्ये आपला पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. अशा गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी हे आपल्याला बँकांकडून देखील वारंवार सांगण्यात येत असते. आपली एक चूक देखील आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळे अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी (Safety Tips) याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहेत. या टीप्स निश्चितच तुम्हाला कुठलाही बँकिंग व्यवहार करताना उपयोगी पडतील.

छोटा आणि सोपा पासवर्ड

बँकिंग व्यवहार करताना आपल्याला अनेकदा पासवर्डची आवश्यकता भासते, जसे की तुमच्या डेबीट कार्डला पासवर्ड असतो, क्रेडिट कार्डला पासवर्ड असतो. नेट बँकिंगमध्ये देखील पासवर्डची आवश्यकता असते त्याशिवाय कोणताही व्यवहार करता येत नाही. मात्र अनेक जण हा पासवर्ड लक्षात राहावा यासाठी सोपा पासवर्ड ठेवण्याची चुक करतात. या पासवर्डमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक अशा गोष्टींचा समावेश असतो, मात्र तुम्ही चुकनही सोपा पासवर्ड ठेवू नका हा पासवर्ड सायबर गुन्हेगार सहज शोधू शकतात.

बँकेशी संबंधित माहिती कोणालाही शेअर करू नका

अनेकदा तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल येतात. तुमच्या बँकेशी संबंधित माहिती तसेच तुमच्या पॅन कार्ड, आधार कार्डशी संबंधित माहिती विचारली जाते. तुमच्याकडे मोबाईलवर आलेल्या ओटीपीची मागणी होते. मात्र तुम्ही अशा स्थितीमध्ये सावध रहा. कोणतीही माहिती शेअर करू नका. लक्षात घ्या बँकेकडून आपल्या ग्राहकांना अशी कोणतीही माहिती विचारली जात नाही. याबाबत बँकांच्या वतीने देखील वारंवार ग्राहकांची जागृकता करण्यात येत असते.

बँक खाते वारंवार चेक करा

आणखी एक महत्त्वाची टीप्स म्हणजे तुम्ही तुमचे बँक खाते दिवसातून एकदा तरी चेक करत चला म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहातील. एखाद्यावेळी तुमच्या खात्यातून रक्कम कपात झाल्याचे तुम्हाला आढळून आल्यास तातडीने आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि झालेल्या व्यवहाराची माहिती द्या. रक्कम कपात कशी झाली याबाबत विचारणा करा.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ