Today’s 29 May 2022 petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात तेजी, पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

| Updated on: May 29, 2022 | 8:33 AM

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसून, गेल्या आठ दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

Todays 29 May 2022 petrol, diesel rates : कच्च्या तेलाच्या दरात तेजी, पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
पेट्रोल, डिझेलचे दर
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात शनिवारी केंद्राकडून पेट्रोल, डिझेलवरील इक्साइज ड्यूटीमध्ये (Excise duty)कपात करण्यात आली होती. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट (Value-Added Tax) कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याने महागाईत होरपळणाऱ्या जनतेला थोडा का होत नाही दिलासा मिळाला. मात्र पेट्रोल पंप चालकांकडून केंद्र आणि राज्य सरकारने अचानक घेतलेल्या कर कपातीच्या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. या निर्णयामुळे आमचे नुकसान झाल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे. कर कपातीचा निषेध करण्यासाठी येत्या 31 मेला पेट्रोल, डिझेलची खरेदी करणार नसल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या दरात तेजी असल्याने पुन्हा पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 111. 30 आणि 98 रुपये एवढा आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.7 रुपये असून, एका लिटर डिझेलसाठी 95.25 रुपये मोजावे लागत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रमुख महानगरातील इंधनाचे दर

  1. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.
  2. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.
  3. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा प्रति लिटर दर अनुक्रमे 102.63 आणि 94.24 रुपये इतका आहे.
  4. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.