Today’s gold-silver prices : गुंतवणुकीची सुवर्णसंधी, आज पुन्हा सोने स्वस्त; जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर

Today's gold-silver prices : गुंतवणुकीची सुवर्णसंधी, आज पुन्हा सोने स्वस्त; जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
आजचे सोन्याचे दर
Image Credit source: TV9 Marathi

आज पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले असून, चांदीच्या दरात देखील घसरण पहायला मिळत आहे.

अजय देशपांडे

|

May 18, 2022 | 12:30 PM

मुंबई : आज पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरात (gold,silver prices) घसरण झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 46,100 रुपये आहे. मंगळवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,550 इतका होता. याचाच अर्थ आज 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 450 रुपयांची घसरण झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,290 रुपये आहेत. मंगळवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,780 इतके होते. आज 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 490 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे आज चांदीच्या दरात देखील घसरण पहायला मिळत असून, मंगळवारी चांदीचे (silver) दर प्रति किलो 61,550 इतका होता. आज त्यामध्ये 770 रुपयांची घसरण झाली असून, आज चांदी प्रति किलो 60,780 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकळी सराफा मार्केट सुरू होताच जाहीर केले जातात. तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या सुमारास सोन्याचे दर जाहीर होतात. त्यामुळे प्रत्येक शहरात सोन्या-चांदीच्या दरात थोडी तफावत आढळते.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज मुंबईमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,290 रुपये इतका आहे. तर 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,100 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,180 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर 50,370 रुपये प्रति तोळा इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,180 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर 50,370 रुपये प्रति तोळा इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,180 रुपये आणि 24 कॅरट सोन्याचा दर 50,370 रुपये प्रति तोळा इतका आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,100 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,290 रुपये इतका आहे. आज चांदीचा दर प्रति किलो 60,780 इतका आहे.

देशाच्या प्रमुख महानगरातील भाव

आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,100 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,290 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,100 रुपये आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,290 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,280 रुपये तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,580 रुपये आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,100 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,290 रुपये इतका आहे.

सोन्यातील गुंतवणूक वाढली

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोने स्वस्त होत असल्याने, सोन्याची खरेदी देखील वाढली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन देखील सोन्याचे दर स्वस्त होत आहेत. सध्या भारतामध्ये लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें