Ujjwala Yojana 2.0: मोफत गॅस कनेक्शनसाठी कसा अर्ज कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ujjwala Yojana 2.0 | दारिदय्ररेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला.

Ujjwala Yojana 2.0: मोफत गॅस कनेक्शनसाठी कसा अर्ज कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पेटीएमच्या या ऑफरनुसार, दररोज 5 लकी ड्रॉ काढले जातील. प्रत्येक विजेत्याला पेटीएमकडून 10,001 रुपयांचे सुवर्ण जिंकण्याची संधी मिळेल. यासह, या ऑफरमध्ये सहभागी होणारे सर्व लोक, जिंको किंवा नको, त्यांना निश्चितपणे 100 रुपयांचे बक्षीस मिळेल. ग्राहकांना फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅपद्वारे पेमेंट करावे लागते. पेटीएमवरून गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधेचा फायदा घेत ग्राहकाला 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची बंपर ऑफर मिळत आहे.

नवी दिल्ली: दारिद्य्ररेषेखालील कुटुंब आणि गरीबांसाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडेल.

उत्तर प्रदेशातील महोबा येथील गरीब कुटुंबांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात येईल. 2016 मध्ये पहिल्यांदा उज्ज्वला योजना सुरु करण्यात आली होती. दारिदय्ररेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी यामध्ये सात श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी निर्धारित लक्ष्य 8 कोटीपर्यंत वाढवण्यात आले.

उज्ज्वला गॅस योजनेसाठी कोण पात्र?

उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी फक्त महिला असतील. गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षे असले पाहिजे. एकाच घरात उज्ज्वला योजनेची एकापेक्षा जास्त कनेक्शन्स नसावीत.

उज्ज्वला योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

उज्ज्वला योजनेसाठी E-KYC अनिवार्य आहेत. आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच द्रारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी सरकारकडून देण्यात आलेले केशरी रेशनकार्डही गरजेचे आहे. लाभर्थी कुटुंबातील सदस्यांची ओळखपत्रेही गरजेची आहेत. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड देणे बंधनकारक असेल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा

> तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. >> pmujjwalayojana.com वर क्लिक करा. >> होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा. >> डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल. >> आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा. >> आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा. >> त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा. >> फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा

संबंधित बातम्या

LIC ची जबरदस्त योजना, एकदाच पैसे भरा आणि 14 लाख मिळवा

शेअर बाजारात येतोय आदित्य बिर्ला सनलाईफचा IPO, गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Published On - 10:49 am, Tue, 10 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI