महागाईच्या तुलनेत गुंतवणुकीवर परतावा हवाय? मग ‘ही’ योजना आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम

महागाई (Inflation) वाढत आहे, मात्र तुम्ही जी गुंतवणूक करता त्या गुंतवणुकीवर तुम्हाला ज्या पटीत महागाई वाढत आहे, त्या पटीमध्ये परतावा मिळतो का? असा प्रश्न विचारल्यास अनेकांचे उत्तर नाही असेच असेल. अनेकांना गुंतवणूक करायची असते, मात्र रिस्क नको म्हणून ते पारंपरीक गुंतवणुकीचे मार्ग निवडतात.

महागाईच्या तुलनेत गुंतवणुकीवर परतावा हवाय? मग 'ही' योजना आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:19 AM

महागाई (Inflation) वाढत आहे, मात्र तुम्ही जी गुंतवणूक करता त्या गुंतवणुकीवर तुम्हाला ज्या पटीत महागाई वाढत आहे, त्या पटीमध्ये परतावा मिळतो का? असा प्रश्न विचारल्यास अनेकांचे उत्तर नाही असेच असेल. अनेकांना गुंतवणूक करायची असते, मात्र रिस्क नको म्हणून ते पारंपरीक गुंतवणुकीचे मार्ग निवडतात. मात्र अनेकदा गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग निवडल्यामुळे त्यांना मोठा फटका बसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास तुमच्याकडे दोन लाख रुपये आहेत, ते तुम्हाला गुंतवयाचे आहेत तर तुम्ही बँक किंवा पोस्टाच्या एखाद्या योजनेची निवड करतात. मात्र त्यात तोटा असा होतो की, आज भारतात महागाई ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळतेच असे नाही. फिक्स डिपॉझिटवर (fd) तुम्हाला जास्तीत जास्त बँका 4.50 ते 5 टक्क्यांपर्यंत वार्षिक अधारावर व्याज देतात. पोस्टाच्या योजनेचे देखील तसेच आहे. या योजनांचा आणखी एक मोठा तोट म्हणजे या योजना दीर्घमुदतीच्या असतात. या सर्व गोष्टींवर मात करायची असेल तर तुमच्यासाठी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक उत्तम पर्याय आहे.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम काय आहे?

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम ही योजना एक प्रकारचा वैविध्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड आहे. ज्यातंर्गत शेअर मार्केतमध्ये आणि विविध मार्केत कॅप असलेल्या निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते. तुम्ही या योजनेमध्ये एका आर्थिक वर्षात जास्ताती जास्त दीड लाखांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. यातून मिळणार परतावा देखील अधिक असतो. महत्त्वाचे म्हणजे इनकम टॅक्स कायदा 80C अंतर्गं तुम्हाला या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर करातून देखील सूट मिळते. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा आहे. तीन वर्षांनंतर तुम्हाला एका चांगल्या परताव्यासह तुमची मुळ रक्कम वापस मिळते.

परतावा किती मिळतो?

गुंतवणुकीचा हा प्रकार इक्विटी श्रेणीमध्ये येतो, या योजनेत जवपास 65 टक्के शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे या योजनेत मिळणारा परतावा हा दीर्घ कालावधीत संबंधित कंपनीच्या शेअरची कामगिरी कशी आहे त्यावर अवलंबून असतो. ELSSचा लॉकइन कालावधी तीन वर्षांचा आहे. तीन वर्षानंतर तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर अधिनियमानुसार सूट मिळते, मात्र योजनेतून मिळणारा परतावा हा करपात्र असतो. परतावा करपात्र असून देखील ही योजना बँक आणि पोस्टाच्या इतर योजनांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय ठरत आहे, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्राप्त आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत या योजनेतून गुंतवणूकदारांना सरासरी बारा टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे.

टीप : वर दिलेली माहिती ही फक्त माहितीच्या उद्देशाने दिलेली आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. टीव्ही 9 मराठी कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.