इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वारंवार का घडतात?, जाणून घ्या त्यामागचे चिनी कनेक्शन

| Updated on: Apr 13, 2022 | 5:30 AM

इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) किती सुरक्षीत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सर्वात पहिल्यांदा ओला (Ola) इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर ओकिनावा (Okinawa)आणि प्युअरच्या इलेक्ट्रिक स्कूटरला देखील आग लागल्याच्या घटना घडल्या.

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना वारंवार का घडतात?, जाणून घ्या त्यामागचे चिनी कनेक्शन
Follow us on

इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) किती सुरक्षीत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सर्वात पहिल्यांदा ओला (Ola) इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर ओकिनावा (Okinawa) आणि प्युअरच्या इलेक्ट्रिक स्कूटरला देखील आग लागल्याच्या घटना घडल्या. प्रसार माध्यमासह सामाजिक माध्यमांवर आगीच्या घटनांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटर किती सुरक्षीत आहेत, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार आता इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे कारण काय याबाबत ओलाकडे खुलासा मागू शकते. मिळत असलेल्या माहितीनुसार कंपनीने याबाबत दिलेल्या एका खुलाशामध्ये आगीच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मतानुसार इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे महत्त्वाचे कारण हे चिनी बॅटरी असू शकते, इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती भारतामध्ये होते, मात्र त्याच्यामध्ये वापण्यात येणारी बॅटरी या चीनमध्ये तयार होतात. या बॅटऱ्या फास्ट चार्ज होतात, परंतु त्या लवकर गरम देखील होतात. सध्या राज्यासह देशात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे या बॅटऱ्या पेट घेत असाव्यात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

याबाबत बोलताना ऑटो एक्सपर्ट टूटू धवन यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्यामागे चिनी कनेक्शन असू शकते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटऱ्यांचा वापर होतो. या बॅटऱ्यांचे उत्पादन जगात सर्वाधिक चीनमध्ये होते. इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये बनवण्यात येत आहेत, मात्र त्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची आयात ही चिनमधून होते. चीनमधून भारतात आयात होणाऱ्या या बॅटऱ्यांची कॉलेटी सर्वोत्तम असेल यात काही शंका नाही, मात्र या बॅटऱ्या खूप फास्ट चार्ज होतात. चार्ज होताना त्या गरम देखील होतात. भारतामध्ये उन्हाचा तडाका वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे गरम झालेल्या या बॅटऱ्या पेट घेत असाव्यात असे धवन यांनी म्हटले आहे.

स्पीड वाढल्यास आगीचा धोका

दरम्यान आता परिवहन मंत्रालय आणि संबंधित कंपन्यांकडून देखील आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पीड जेव्हा नियंत्रणात असते, तेव्हा ती स्कूटर व्यवस्थित चालते. मात्र जेव्हा स्पीड जास्त असते तेव्हा लिथियम आयन बॅटरीवरील ताण वाढतो. ताण वाढल्याने शॉर्टसर्कीट होते आणि स्कूटर पेट घेत असावी असा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या अपघातामध्ये किंवा अन्य काही कारणामुळे जर बॅटरी थोडी जरी डॅमेज झाली असेल तरी देखील आग लागण्याची शक्यता वाढते.

संबंधित बातम्या

Second hand Car: अवघ्या 5.35 लाखात घरी न्या Mahindra Thar SUV, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Flipkart Big Saving Days Sale: 15,000 रुपयांच्या रेंजमधील टॉप स्मार्टफोन्सवर तब्बल 27 टक्के डिस्काऊंट

Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदारांना लाखो रुपयांचा फायदा; आयसीआयसीआय सिक्योरिटीजकडून टॉप पिक म्हणून निवड