Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदारांना लाखो रुपयांचा फायदा; आयसीआयसीआय सिक्योरिटीजकडून टॉप पिक म्हणून निवड

ब्रोकरेज हाउसकडून (Brokerage Houses) वेळेवेळी मल्टीबॅगर स्टॉकचा अभ्यास केला जात असतो, त्याच आधारावर गुंतवणुकदारांना सल्ला देखील देण्यात येतो. यातील काही शेअर्सची निवड ब्रोकरेज हाउसकडून टॉप पिकचे शेअर म्हणून निवड केली जाते.

Multibagger Stock : 'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदारांना लाखो रुपयांचा फायदा; आयसीआयसीआय सिक्योरिटीजकडून टॉप पिक म्हणून निवड
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:58 AM

गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांना मोठा फटका बसला. शेअर बाजारावर देखील लॉकडाऊनचा नकारात्मक परिणम पहायला मिळाला. शेअरमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे पहायला मिळाले. या सर्वांमध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. शेअर मार्केटमध्ये स्थिरता कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच परिस्थितीमध्ये बदल होऊन, शेअर बाजारात तेजी आली. अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर परतावा (Multibagger Return) देणारे ठरते. त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. ब्रोकरेज हाउसकडून (Brokerage Houses) वेळेवेळी अशा स्टॉकचा अभ्यास केला जात असतो, त्याच आधारावर गुंतवणुकदारांना सल्ला देखील देण्यात येतो. यातील काही शेअर्सची निवड ब्रोकरेज हाउसकडून टॉप पिकचे शेअर म्हणून निवड केली जाते. असाच एक शेअर्स आहे, गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडचा (Gujarat Fluorochemicals Limited) या शेअर्सची निवड ब्रोकरेज हाउस आयसीआयसीआय सिक्योरिटीजकडून टॉप पिक म्हणून निवड करण्यात आली आहे.

शेअरमधून मिळालेला परतावा

गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते की गेल्या एक महिन्यामध्ये या शेअर्सच्या परताव्यामध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यांमध्ये या शेअर्सच्या किमतीमध्ये 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास या शेअर्समध्ये तब्बल 320 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर्स 707.70 रुपयांवरून तीन हजारांवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील काळात देखील या शेअर्समध्ये तेजी कायम राहणार असून, हा शेअर्स येत्या काळात बारा टक्क्यांच्या वाढीसह 3356 रुपयांवर पोहोचू शकतो असा अंदाज आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढली

कोरोना काळात अनेक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधील आपली गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये तेजी दिसत असून, अनेक जण शेअरमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये काही अंशी चढ-उतार पहायला मिळत आहे. मात्र तरी देखील काही कंपन्यांच्या शेअर्समधून चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

संबंधित बातम्या

Petrol Diesel Rate: इंधन दरवाढीला ब्रेक, सलग सहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या भावात वाढ नाही; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश

राजलक्ष्मी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये फ्रॉड ट्रेडिंग, सेबीकडून 13 कंपन्यांना 40 लाखांचा दंड

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.