AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) आणखी चार सहकारी बँकांविरोधात (Cooperative banks) कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन (Regulatory compliances) केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश
आरबीआयचा कारवाईचा बडगाImage Credit source: Newsclick
| Updated on: Apr 12, 2022 | 6:26 AM
Share

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) आणखी चार सहकारी बँकांविरोधात (Cooperative banks) कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन (Regulatory compliances) केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या बँकांना एकूण चार लाखांचा दंड थोटावण्यात आला आहे. या प्रकारची कारवाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनेकदा बँकांवर केली जाते. बँकांच्या कारभारावर आरबीआयची करडी नजर असते. आरबीआयने घालून दिलेले नियम आणि सूचनांचे एखाद्या बँकेने उल्लंघन केल्यास त्या बँकेवर आरबीआय दंडात्मक कारवाई करते. प्रकरण गंभीर असेल तर प्रसंगी त्या बँकेचा परवाना देखील रद्द होतो. रिझर्व्ह बँकेने एक प्रेस नोट रिलीज करत या बँकांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भांत माहिती दिली.

महाराष्ट्रातील तीन बँका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यातील तीन बँका या महाराष्ट्रातील आहे. यामध्ये अंदरसुल शहरी को-ऑपरेटिव्ह बँक, अहमदनगर जिल्ह्यातील महेश अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक, नांदेडमधाील मर्चेंट को – ऑपरेटिव्ह बँक आणि शहडोल स्थित जिल्हा सहकारी केंद्रीय बँक यांचा समावेश आहे. यातील अंदरसुल शहरी को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर अहमदनगर जिल्ह्यातील महेश अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक आणि शहडोल स्थित जिल्हा सहकारी केंद्रीय बँक यांना प्रत्येकी एक लाखांचा आणि नांदेडमधील मर्चेंट को – ऑपरेटिव्ह बँकेला पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधित बँकांवर ही कारवाई करण्यात आली असून, याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अ‍ॅक्सिस आईडीबीआयवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच आरबीआयकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेवर कारवाई करण्यात आली होती. अ‍ॅक्सिस बँकेला तब्बल 93 लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता. अ‍ॅक्सिस सोबतच याच प्रकरणात आईडीबीआय बँकेवर देखील कारवाई करण्यात आली, या बँकेला आरबीआयकडून 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येते.

संबंधित बातम्या

राजलक्ष्मी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये फ्रॉड ट्रेडिंग, सेबीकडून 13 कंपन्यांना 40 लाखांचा दंड

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु

Make in India, Flights : पहिले स्वदेशी विमान घेणार उड्डाण, काय आहे विशेष, हे विमान कोणत्या मार्गाने जाणार जाणून घ्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.