LIC Scheme : परताव्याची हमी, विम्याचा पण लाभ, एलआयसीची ही योजना करेल मालामाल

LIC Scheme : एलआयसीच्या अनेक योजना लोकप्रिय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना विम्याचा लाभ तर मिळतोच पण गुंतवणुकीवर जोरदार परतावा ही मिळतो. ही पॉलिसी तुम्हाला काही दिवसांत मालामाल करु शकते.

LIC Scheme : परताव्याची हमी, विम्याचा पण लाभ, एलआयसीची ही योजना करेल मालामाल
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:40 PM

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) अनेक योजना लोकप्रिय आहेत. एलआयसी ही सरकारची सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीवर भारतीय नागरिकांचा मोठा विश्वास आहे. एलआयसी केवळ विमा योजना बाजारात आणत नाही तर या योजनेत बचत, शेअर मार्केट लिंक्ड अशा योजना ही असतात. केवळ विमा विक्री हे एलआयसीचे उद्दिष्ट असले तरी गुंतवणूक योजना ही राबविण्यात येते. ग्राहकांना विम्याचे संरक्षण तर मिळतेच पण त्यांना इतर बचत योजनांसारखाच परतावा पण मिळविता येतो. त्यामुळे त्याला विमा(Insurance) आणि गुंतवणुकीसाठी (Investment) एकाच योजनेत रक्कम गुंतविता येते.

तर एलआयसीच्या अनेक योजनांपैकी धन संचय ही एक योजना आहे. ही योजना लोकप्रिय आहे. ही एक नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंगक इंडिविज्यूएल सेव्हिंग प्लॅन विथ लाईफ इन्शुरन्स आहे. मॅच्युरिटीपूर्वीच या योजनेत गुंतवणूकदारांना हमीपात्र उत्पन्न मिळते. जबरदस्त परतावा आणि विम्याचे संरक्षण असे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना नुकसान भरपाईची तरतूद आहे.

एलआयसी धन संचय पॉलिसीअतंर्गत अनेक सुविधा मिळतात. मृत्यूनंतर वारसांना मिळणारी नुकसान भरपाई तुम्ही एकरक्कमी अथवा पाच वर्षांत हप्त्याने घेऊ शकतात. मॅच्युरिटीत हमखास उत्पन्न आणि टर्मिनल बेनिफट मिळतो. या पॉलिसीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

गुंतवणुकीचे चार पर्याय एलआयसी धनसंचय पॉलिसीत गुंतवणुकीसाठी चार पर्याय मिळतात. त्यांना ए, बी, सी आणि डी अशी नावे आहेत. यामध्ये ए आणि बी या योजनेत कमीत कमी 3 लाख 30 हजार रुपये गुंतवावे लागतात. पर्याय सीमध्ये कमीत कमी 2 लाख 50 हजार रुपये आणि डी या पर्यायामध्ये 22 लाख रुपयांच्या विम्याची संधी मिळते.

या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 3 वर्ष आहे. तर कमाल वयाची मर्यादा ही ए, बी, सी आणि डी या पर्यायानुसार बदलते. ए, बी या पर्यायासाठी ही वयोमर्यादा 50 वर्षे आहे. तर सी हा पर्याय निवडल्यास, अधिकत्तम वयोमर्यादा 65 वर्ष आहे. तर पर्याय डी अंतर्गत ही वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.

इतक्या वर्षांची गुंतवणूक

या विमा योजनेत 5 ते 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूकदाराला अजून एक फायदा मिळतो. तुम्हाला गुंतवणुकीवर कर्ज उपलब्ध होते. तर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना डेथ बेनेफिट मिळतो. एकाच योजनेत अनेक फिचर्स देऊन कंपनीने ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे. ही योजना सर्वच बाजूने ग्राहकांच्या फायद्याची दिसून येते.

इतका हप्ता करावा लागतो जमा

धनसंचय योजनेत गुंतवणुकीसाठी 5, 10 वा 15 वर्षे अशी वर्षे आहेत. या कालावधीसाठी तुम्हाला योजनेत गुंतवणूक करता येते. जितके अधिक वर्षे तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढा अधिकचा फायदा मिळतो. या पॉलिसीतंर्गत वार्षिक कमीतकमी 30 हजार रुपयांचा हप्ता जमा करावा लागेल. पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर कमीत कमी 2.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 22 लाख रुपये डेथ बेनेफिट मिळतो.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.