Aadhaar Card : काय सांगता, नकळत वापरताय बनावट आधार कार्ड? येथे करा चेक

| Updated on: Feb 26, 2023 | 8:18 PM

Aadhaar Card : तुमच्याकडील आधार कार्ड खरे आहे हे कशावरुन ओळखाल? तुमचे आधार कार्ड बनावटही असू शकते. या पद्धतीने, प्रक्रियेने तुम्हाला बनावट आधार कार्ड शोधता येईल.

Aadhaar Card : काय सांगता, नकळत वापरताय बनावट आधार कार्ड? येथे करा चेक
Follow us on

नवी दिल्ली : आता प्रत्येक ठिकाणी ओळखपत्राच्या स्वरुपात (ID Proof) आधार कार्डचा (Aadhar Card) वापर करण्यात येतो. तुम्हाला नवीन खाते उघडायचे असेल अथवा नवीन सिमकार्ड असो वा भाड्याने घर घ्यायचे असो, तुम्हाला आधार कार्डची गरज पडते. अशावेळी तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचे महत्वाचे काम अडकू शकते. त्यामुळे तुमच्या लक्षात आले असेल की, हा 12 आकड्यांचा युनिक क्रमांक तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. सध्या अनेकदा नकली आधार कार्ड ही (Fake Aadhaar Card) तयार करण्यात येते. त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो. तुमच्याही फोटोआधारे बनावट आधार कार्ड तयार करण्यात येऊ शकते. अथवा तुमच्या माथी दुसऱ्या क्रमांकाचे आधार कार्ड मारण्यात येऊ शकते.

देशात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये खऱ्या आधार क्रमाकांऐवजी खोट्या 12 डिजिटच्या आधार क्रमांक तयार करुन त्याचा चुकीचा वापर करण्यात आला आहे. अशावेळी आपल्याकडील आधार कार्ड खरे आहे की खोटे हे कसे ओळखता येईल? यासंबंधीची माहिती तुम्हाला असणेही आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्डचे सत्यापन (Aadhaar Card Verification) करणे आवश्यक आहे.

आधारकार्डचा खरेपणा (Aadhar Card Authenticity) ओळखण्यासाठी त्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून तपासणी करता येते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) त्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अनेक लोकांना त्याची माहिती नाही. आधार कार्ड तपासण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. त्याआधारे काही मिनिटातच तुम्हाला आधार कार्ड खरे की खोटे याची माहिती घेता येते.

हे सुद्धा वाचा
  1. आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी ही आहे प्रक्रिया
  2. सर्वात अगोदर uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
  3. याठिकाणी माय आधार(My Aadhaar) या पर्यायामध्ये आधार सेवावर (Aadhaar Services) क्लिक करा
  4. याठिकाणी तुम्हाला व्हेरिफाय आधार क्रमांक हा पर्याय दिसेल
  5. हा पर्याय निवडा. त्यानंतर एक नवीन पेज, विंडो उघडेल
  6. या नवीन पेज, विंडोवर आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
  7. तुमचा संपूर्ण तपशील जमा करा. प्रोसिड एंड व्हेरिफाय आधारवर क्लिक करा
  8. पुन्हा नवीन विंडो उघडेल, याठिकाणी तुम्हाला आधार क्रमांकासोबत EXISTS दिसेल
  9. व्हेरिफायच्या प्रक्रियेतील ही पायरी महत्वाची आहे. EXISTS चा अर्थ आधार कार्ड खरे आहे
  10. याठिकाणी तुमचा सर्व तपशील तुम्हाला पहायला मिळेल
  11. तुमच्या तपशीलासोबत माहिती जुळली नाही तर त्याठिकाणी Error लिहिलेले असेल