100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 17 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 10:43 AM

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

शहांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात इतर महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत.