धाक धुक वाढली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, अखेर दहावीच्या निकालाची तारीख जाहीर. 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार
SSC Result 2024: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 27 मे 2024 रोजी निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
आईचे नाव टाकून महाराष्ट्र 10 वीचा निकाल पाहता येणार. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा.
• mahresult.nic.in ला भेट द्या.
• SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.
• रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
• त्यानंतर तुम्हाला SSC Result तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
एसएमएसवर चेक करा 10 वीचा निकाल
• एसएमएस (SMS) वर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम फोनमधील मेसेज बॉक्स ओपन करा.
• त्यानंतर MHSSC (स्पेस द्या) सीट नंबर किंवा रोल नंबर टाईप करा.
• मग हा टाईप केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर सेंड करा.
• यानंतर तुम्हाला मेसेजवर तुमचा निकाल पाहता येईल.
Latest Videos
Latest News