Tahawwur Rana : मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
Tahawwur Rana Extradition : मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सूत्रधार तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आला आहे. पालम टेक्निकल विमानतळावर तहव्वूर राणाला घेऊन आलेले विशेष विमान उतरले.
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सूत्रधार तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आला आहे. पालम टेक्निकल विमानतळावर विशेष विमान उतरले. येथून त्याला एनआयए कार्यालयात आणले जाईल. त्याच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांच्या तिसऱ्या बटालियनची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. या पथकात एक पायलट कार आणि एक एस्कॉर्ट कार आणि एक प्रिझन व्हॅनचा समावेश असेल. तिसऱ्या बटालियनच्या या पथकात १५ पोलिसांचा समावेश असेल, जे अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असतील. तहव्वुर राणा यांच्या न्यायालयात हजेरी आणि तुरुंगात जाण्याची सुरक्षा देखील या बटालियनकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर, एनआयए त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि न्यायालयाकडून त्याचा रिमांड मागेल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

