भविष्यात भीषण पाणी टंचाई, जलाशयात फक्त ३४ टक्के पाणी साठा शिल्लक अन् प्रशासन अलर्ट मोडवर
VIDEO | बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन, जलाशयात फक्त ३४% पाणीसाठा, प्रशासन काय उचलणारं पाऊलं?
बुलढाणा : वाढत्या उन्हामुळे जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याने तसेच धरणात असलेल्या गाळामुळे धरणात पाण्याची क्षमता कमी झाली आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयांमधील पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात घटत आहे. सध्या जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा ५१ प्रकल्पांमध्ये केवळ ३४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे मे महिन्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परतीचा पाऊस ही जोरदार झाल्याने धरणांमधील जल पातळीत वाढ झाली होती. मात्र, धरणात असलेल्या गाळामुळे धरणाच्या पाणी संचय क्षमतेत कमालीची घट झाली आहे तर गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई जाणवणार आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन यावर काय उपाययोजना करते यावर नागरिकाचे लक्ष आहे. सध्या जिल्ह्यात ०३ तालुक्यात ०७ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तर ०९ तालुक्यातील ९७ गावातील १०४ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?

