4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 1 August 2021

तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्यावर सेना-नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. ज्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा लाड यांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI