AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 21 August 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 21 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:53 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे आतापर्यंत 18,000 लोकांना सुखरुप बाहेर काढल्याचं सांगताना बायडन यांनी रेस्कू ऑपरेशननंतर संपूर्ण सैन्य अफगाणमधून बाहेर काढू, असंही सांगितलं.

जो बायडन म्हणाले, “पुढील आठवड्यात G 7 बैठकीत अफगाणिस्तान मुद्यावर चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन केला जाणार नाही. तालिबानने अमेरिकेवर हल्ला केला तर त्याला उत्तर देऊ. NATO देश अमेरिकेबरोबर उभे आहेत. आतापर्यंत 18,000 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जेलमधून निघालेले IS चे दहशतवादी हल्ला करू शकतात. अफगाणिस्तानमध्ये संकट मोठं आहे.”

“शरणार्थी लोकांना सगळी मदत पुरवण्यात येतेय. जे अमेरिकन नागरिक परत येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना परत आणणार आहे. ISIS दहशतवाद्यांकडून जास्त धोका आहे. आम्ही काबूल एअरपोर्ट पूर्णपणे सुरक्षित केले आहे. अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणार आहे. अफगाणिस्तानमध्ये युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. महिला आणि मुलांवरचा हल्ला सहन करणार नाही,” अशी भूमिका बायडन यांनी मांडली.