4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 27 August 2021

विमानतळाच्या बाहेर ISIS कडून हल्ला करण्यात आला. यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर 18 सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे ISIS-K या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Aug 27, 2021 | 7:40 AM

अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 72 लोकांचा मृत्यू झालाय. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळपास 143 लोक जखमी झालेत.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर ISIS कडून हल्ला करण्यात आला. यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर 18 सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे ISIS-K या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.

अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें