4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 3 October 2021
रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचं हे कथित संभाषण व्हायरल झालं आहे. 1 मिनिट 10 सेंकदाची ही क्लिप आहे. या क्लिपमध्ये कर्वे हे कदम यांना परब यांच्या कार्यालयावर कारवाई होणार असल्याचं सांगत आहे. अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याची ऑर्डर निघालेली आहे. लोकायुक्तांनी ही ऑर्डर काढली असून एक महिन्याच्या आत हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत, असं कर्वे कदम यांना सांगतात.
शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांचा कथित पीए प्रसाद कर्वे यांच्यासोबतच्या संभाषणाची ही क्लिप आहे. या क्लिपमध्ये कर्वे हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयावर हातोडा पडणार असल्याचं कदम यांना सांगत आहेत. तर कदम त्यावर व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणताना ऐकायला मिळतंय. रामदास कदम यांनी या क्लिपशी काही संबंध नसल्यांचं सांगितलं असलं तरी या कथित ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्या अडचणीत आले आहेत.
रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांचं हे कथित संभाषण व्हायरल झालं आहे. 1 मिनिट 10 सेंकदाची ही क्लिप आहे. या क्लिपमध्ये कर्वे हे कदम यांना परब यांच्या कार्यालयावर कारवाई होणार असल्याचं सांगत आहे. अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याची ऑर्डर निघालेली आहे. लोकायुक्तांनी ही ऑर्डर काढली असून एक महिन्याच्या आत हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत, असं कर्वे कदम यांना सांगतात. वांद्रे येथील म्हाडाच्या दोन इमारतीमध्ये परब यांचं हे कार्यालय असल्याचं कर्वे सांगतात. त्यावर व्हेरी गुड व्हेरी गुड…ऑर्डरची कॉपी आहे का? असा सवाल कदम करतात. त्यावर आजच ऑर्डर निघाली असून दोन दिवसात कॉपी हाती येईल, असं कर्वे सांगताना दिसत आहेत. त्यावर अच्छा. म्हणजे आता परब यांच्यावर गुन्हा दाखल होईल तर असं कदम म्हणत असल्याचं ऐकायला मिळतं.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

