रामदास कदम यांच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल; शिवसेनेत खळबळ; वाचा, संभाषण जसेच्या तसे

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. (shiv sena leader ramdas kadams three audio clip goes viral)

रामदास कदम यांच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल; शिवसेनेत खळबळ; वाचा, संभाषण जसेच्या तसे
ramdas kadam

मुंबई: शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या तीन ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ऑडिओ क्लिप पार्ट-1 कथित संभाषण (1.42 सेकंद)

प्रसाद कर्वे: हॅलो
रामदास कदम: कुठे आहेस?
प्रसाद कर्वे: आहे… दापोलीत आहे.
रामदास कदम: आला का किरीट सोमय्या? आला? ओके. तू किती वाजता येणार आहेस त्याला घेऊन.
प्रसाद कर्वे: तो मला त्याचा कार्यक्रम संपला की फोन करणार आहे.
रामदास कदम: ओके ओके ओके
प्रसाद कर्वे: हां
रामदास कदम: पण मग तिथून निघताना मला फोन लाव
प्रसाद कर्वे: हो, लावतो… लावतो
रामदास कदम: म्हणजे इथे मग कुणाला मी थांबवणार नाही ना
प्रसाद कर्वे: हा… चालेल, चालेल
रामदास कदम: सर्वांना पाठवून देईल
प्रसाद कर्वे: हो, चालेल
रामदास कदम: बाकी मिटिगं छान झाली ना
प्रसाद कर्वे: हो, छान झाली, छान झाली
रामदास कदम: येडा आहे रे तो. त्याला समजच नाही काही
प्रसाद कर्वे: काय नाय हो, गैरसमजूतीने हे झालं म्हणूनच मी तुमच्या पाठी लागलो. बाकी काही नाही
रामदास कदम: हो हो… आपण त्याला समजवायला नको.
प्रसाद कर्वे: हो
रामदास कदम: त्यांनी एक फोन लावायला हवा होता. विचारायला हवं होतं. असं कसं
प्रसाद कर्वे: मी त्यांना जेव्हा घटना घडली तेव्हा सांगितलं होतं तुम्ही भाईंना डायरेक्ट फोन लावा.
रामदास कदम: एक्झॅट… एक्झॅट… परफेक्ट
प्रसाद कर्वे: हो
रामदास कदम: आता काल त्याला कळलं असेल ना
प्रसाद कर्वे: हो, कळलं कळलं कळलं. हो
रामदास कदम: हे बदमाश आहेत बाकीचे लोक
प्रसाद कर्वे: हो… हो
रामदास कदम: त्याला बाजूला करायचं आहे ना त्यांना
प्रसाद कर्वे: आणि थोडं काय आहे ना भाई, काही लोकं दादा आणि केदार यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
रामदास कदम: म्हणूनच दादा आणि केदारसाठी आपण बसलो होतो ना. तो विषय संपून जाईल ना तो.
प्रसाद कर्वे: हो… हो
रामदास कदम: तो विषय संपून जाईल ना
प्रसाद कर्वे: हो… हो
रामदास कदम: असं काय, ते आपण होऊ देणार नाही यांचं. काल मी ज्या स्टाईलने बोललो ते तुमच्या लक्षात आलं असेल सगळं.
प्रसाद कर्वे: हो… हो
रामदास कदम: कोणीही असलं तरी काय बोलायचं ते बोललो मी. जास्त लाड झाले. तू ये निघताना फोन लाव मला.
प्रसाद कर्वे: हो, लावतो… लावतो
रामदास कदम: ओके… ओके… ओके


————————————————-

ऑडिओ क्लिप पार्ट-2 कथित संभाषण (1.34 सेकंद)

रामदास कदम: हॅलो
प्रसाद कर्वे: भाई प्रसाद बोलतोय.
रामदास कदम: हां बोल
प्रसाद कर्वे: हां, ते जे… महावितरणलाही त्यांनी कागद दिले आहेत त्याच्या नावाने. कनेक्शन घेतलं आहे.
रामदास कदम: काय ते?
प्रसाद कर्वे: महावितरणला त्याने कनेक्शन त्याच्या नावाने घेतलंय अनिल परबच्या नावाने.
रामदास कदम: हो ना…
प्रसाद कर्वे: हो हो… ते तुम्हाला पाठवलं बघा.
रामदास कदम: हो, पण तो नाही म्हणतोय ना. माझा काही संबंध नाही बांधकामाशी म्हणतोय.
प्रसाद कर्वे: हो… विभागसाठी उद्या फौजदारी गुन्हा दाखल करतोय म्हणतोय पोलीस स्टेशनला.
रामदास कदम: ओके ओके
प्रसाद कर्वे: दोघांच्या विरुद्ध… दोघांच्या विरुद्ध…
रामदास कदम: त्याने अॅफिडेव्हिट द्यायला पाहिजे पण…
प्रसाद कर्वे: घेतलं. नोटरी केली त्यांनी.
रामदास कदम: हां… बास बास बास…
प्रसाद कर्वे: हां. नोटरी केली त्याने.
रामदास कदम: मग काय अडचण नाही.
प्रसाद कर्वे: हो हो हो
प्रसाद कर्वे: त्याने नोटरी केलं. आता गुरुवारी येऊन तो फौजदारी गुन्हा दाखल करतोय.
रामदास कदम: ओके ओके ओके
प्रसाद कर्वे: हा घएऊन च येतोय… किरीट सोमय्या घेऊनच येतोय त्याला.
रामदास कदम: हो ना
प्रसाद कर्वे: हो हो
रामदास कदम: ओके ओके, येईल अडचणीत येईल. शंभर टक्के अडचणीत येईल.
प्रसाद कर्वे: हो हो
रामदास कदम: हम्म (काही सेकंद शांतता) मी येतो 23 तारखेला संध्याकाळी खेडला.
प्रसाद कर्वे: 24ला
रामदास कदम: 23 ला
प्रसाद कर्वे: ठिक आहे ठिक आहे. हो चालेल
रामदास कदम: ओके


———————————————————————————–

ऑडिओ क्लिप पार्ट-3 कथित संभाषण (1.10 सेकंद)

रामदास कदम: हॅलो
प्रसाद कर्वे: भाई ते अनिल परबचं कार्यालय तोडायची ऑर्डर झालीय
रामदास कदम: कुठलं कार्यालय
प्रसाद कर्वे: वांद्र्याचं कार्यालय होतं बघा, म्हाडाच्या दोन इमारतीमधलं.
रामदास कदम: वाह… व्हेरी गुड. व्हेरी गुड
प्रसाद कर्वे: लोकायुक्तांनी ऑर्डर दिलीय. एक महिन्याच्या आत बांधकाम पाडून टाकावं.
रामदास कदम: मग त्याच्यावर गुन्हाही दाखल होईल ना
प्रसाद कर्वे: हो गुन्हाही दाखल होणार.
रामदास कदम: गुन्हा दाखल झाला तर राजीनामा द्यावा लागेल मग
प्रसाद कर्वे: हो हो
रामदास कदम: गुन्हा दाखल झाला ना तर मग त्याला रिझाईन द्यावा लागेल ना.
प्रसाद कर्वे: होय होय…
रामदास कदम: असं काय
प्रसाद कर्वे: हो
रामदास कदम: व्हेरी गुड व्हेरी गुड… त्याची कॉपी आहे का तुझ्याकडे?
प्रसाद कर्वे: नाही. आज ऑर्डर झालीय. पण दोन दिवसांनी कॉपी मिळेल.
रामदास कदम: ओके ओके…
प्रसाद कर्वे: हां हां
रामदास कदम: ऑर्डर झाली तर अनधिकृत बांधकाम केलं म्हणून गुन्हाही दाखल करावा लागेल. एमआरटीपीच्या माध्यमातून गुन्हा होईल ना दाखल
प्रसाद कर्वे: हो हो, होईल ना… होईल ना… करणार आहे तो.
रामदास कदम: हम्म
प्रसाद कर्वे: किरीट सोमय्या करणार आहे.
रामदास कदम: ओके ओके ओके ओके

संबंधित बातम्या:

ते पाप माझ्या हातून होणार नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेत भूकंप? परबांच्याविरोधात ईडीची कारवाई, रामदास कदम म्हणतात, वाहवा वाहवा, ऑडिओ क्लिप व्हायरल

काका-पुतण्याचं भांडण, रामविलास पासवान यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवलं; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

(shiv sena leader ramdas kadams three audio clip goes viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI