4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 30 June 2021
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत जवळपास 1 तास चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर आता पडदा पडल्याचं सांगितलं जात आहे. कारण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांच्या फेऱ्या मारल्यानंतर आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत जवळपास 1 तास चर्चा झाली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा सुसंवाद सुरु झाल्याचं आता बोललं जात आहे. तर दुसरीकडे पवार आणि ठाकरे यांच्या बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

