4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 December 2021

गेल्या काही दिवसात मुंबईत (Mumbai on Omicron Alert) ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा देशातून हजार पाचशे नाही तर 2668 जण दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे.

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, (Karnatak Omicron Cases ) त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, ह्या माहितीनेच डोकं भणाणत असतानाच आता मुंबईकरांचं, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे. कारण गेल्या काही दिवसात मुंबईत (Mumbai on Omicron Alert) ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा देशातून हजार पाचशे नाही तर 2668 जण दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी आता घरात आणि घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच अवकाळी पावसानं वातावरण डल केलेलं असताना, त्यात आणखी आरोग्याच्या समस्या उदभवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI