VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 1 May 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा होणार आहे. या दोन्ही सभांवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्द नाही. तुमचाच शब्द आहे. नाटक हे नाटक असतं हो. तीन तास जायचं, एन्जॉय करायचा आणि घरी जायचं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा होणार आहे. या दोन्ही सभांवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. तुम्हीच म्हणता आज महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा हा माझा शब्द नाही. तुमचाच शब्द आहे. नाटक हे नाटक असतं हो. तीन तास जायचं, एन्जॉय करायचा आणि घरी जायचं. ते वास्तव थोडीच असतं. तो ड्रामा असतो हो, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळेयांनी हा टोला लगावला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करतानाच राज ठाकरे आणि फडणवीसांवर टीका केली. तसेच राज ठाकरे यांच्या सभेला शुभेच्छा देतानाच राज यांच्या भोंग्यावरून सरकारला अल्टिमेटम देण्याच्या इशाऱ्याची खिल्लीही उडवली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

