VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 7 April 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 7 April 2022

| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 3:25 PM

एकिकडे भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध केला. वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकारमधील भाजप जबाबदार असून यामुळे सामान्यांची गळचेपी होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.

एकिकडे भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध केला. वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकारमधील भाजप जबाबदार असून यामुळे सामान्यांची गळचेपी होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच प्रत्येक गोष्टीत वाढती महागाई ही डोकेदुखी ठरली असून ही डोकेदुखी थांबण्यासाठी आंदोलकांनी झंडूबामचे वाटप केले. उस्मानाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.