अनधिकृत इमारतींचा भांडाफोड; शासकीय कार्यालयाच्या बनावट शिक्के आणि लेटर हेडचा वापर उघड
पण आता विरारमध्ये शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के आणि लेटर हेड बनवणारी टोळीचा भांडाफोड झाला आहे. यानंतर आता धक्कादायक बाब उघडकीस आली असून या टोळीकडून बनावट शिक्के आणि लेटरहेडद्वारे ५५ इमारती थाटल्याच्या प्रकार आता उघड झाला आहे.
विरार,9 ऑगस्ट 2023 । शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के आणि लेटर हेडचा वापर करून अनेकांना गंडा घातल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण आता विरारमध्ये शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के आणि लेटर हेड बनवणारी टोळीचा भांडाफोड झाला आहे. यानंतर आता धक्कादायक बाब उघडकीस आली असून या टोळीकडून बनावट शिक्के आणि लेटरहेडद्वारे ५५ इमारती थाटल्याच्या प्रकार आता उघड झाला आहे. या बोगस शिक्के आणि लेटरहेडद्वारे पालिकेच्या परवाणग्या घेवून, इमारती बनवल्या असल्याचे तपास उघड झाले आहेत. त्यानंतर येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. मोल मजूरी करुन, पै नी पै जमा केलेल्या पैशातून इमारतीमध्ये घर घेतलं आणि बिल्डरांनी फसवल्यामुळे सध्या या इमारतीतील रहिवाशांवर जगाव की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

