Saamana Editorial Video : ‘हा भाजपचा जादूटोणाच… निवडणूक आयोगाला कणा नाही’, ‘सामना’तून वाढीव मतदानावर टीकास्त्र
प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेल्या मतदानात अनेक ठिकाणी फरक असल्याचेही म्हटलं आहे. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेनंतर मतदान वाढलं आणि भाजपचा विजय झाला हा जादूटोणाच असल्याचे म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 76 लाख वाढीव मतांचा घोटाळा झाला आहे, असा दावा सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेल्या मतदानात अनेक ठिकाणी फरक असल्याचेही म्हटलं आहे. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेनंतर मतदान वाढलं आणि भाजपचा विजय झाला हा जादूटोणाच असल्याचे म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतमोजणीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि काऊंटर व्होट्सची जुळणी होत नसेल तर नक्कीच घोटाळा झालाय. हायकोर्टाने 76 लाख वाढीव मतांचा हिशोब विचारला त्यावेळी राहुल गांधींनी लोकसभेत याच 76 लाख मतांवर प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोगाला कणा नाही, प्रशासन सत्ताधाऱ्यापुढे सरपटत आहे. असं म्हणत सरकारवर जिव्हारी लागणारी टीका केली. तर लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या न्यायालयांची आहे. एका-एका मताने जय-पराजय ठरतात, मोठमोठी सरकारे कोसळतात. इकडे तर 76 लाख मतांचा सवाल आहे. मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला का जात नाहीत? या प्रश्नाइतकेच 76 लाख वाढीव मतांचा बाप कोण? असा सवाल सामनातून करण्यात आलाय. महाराष्ट्रात 76 लाख वाढीव मतांचा घोटाळा झालाच आहे ही श्रद्धा आहे, आणि ‘वर्षा’ बंगल्यात गुवाहाटीतून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगे पुरली आहेत ही अंधश्रद्धा आहे, पण महाराष्ट्र त्यामुळे गोंधळला आहे एवढे खरे, असे सामनातून म्हटले आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
