AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron | दिवसभरात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 8 नवे रुग्ण सापडले

Omicron | दिवसभरात महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 8 नवे रुग्ण सापडले

| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 8:24 PM
Share

राज्यात आज दिवसभरात 8 जणांचा ओमिक्रॉन (Omicrom) अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 8 रुग्णांपैकी 7 जण मुंबई (Mumbai)तर एक रुग्ण वसई-विरार(Vasai-Virar)मधला असल्याचं समजतंय.

मुंबई : राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात आज दिवसभरात 8 जणांचा ओमिक्रॉन (Omicrom) अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 8 रुग्णांपैकी 7 जण मुंबई (Mumbai)तर एक रुग्ण वसई-विरार(Vasai-Virar)मधला असल्याचं समजतंय. एकूण रुग्णांमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.

रुग्णसंख्येत पडतेय भर
राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढत चाललीय. आकडा एकूण २८वर पोहोचलाय. काल सापडलेल्या रुग्णांच्या अपडेटनुसार, ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 9 जणांची आरटीपीसीआर (RTPCR)चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली होती. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, वसई-विरारमध्ये 1, नागपूर 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला.