लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘हा’ आमदार बांधणार शिवबंधन
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
नंदुरबार, १७ मार्च २०२४ : नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईची दिशांनी निघाले असून ते आजच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. नंदुरबार जिल्ह्यातून आमदार आमश्या पाडवी हे मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदे गटात जाणार आहे. शिवसेना उबाठाकडे एकही आदिवाशी चेहरा नव्हता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना संधी दिली. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवला. त्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. अनेक बड्या नेत्यांना डावूलन त्यांना नंबर लावल्याने पक्षात नाराजी होती.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

