लोकसभा निवडणुका जाहीर होताच फडणवीसाचं पहिलं ट्वीट, काय व्यक्त केला विश्वास?
केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीतील सर्वात मोठा महोत्सव जाहीर झाल्याचे म्हटले आहे. इतकंच नाहीतर 4 जून 2024 ला 400 पार...
मुंबई, १६ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकांची घोषणा जाहीर होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत लोकशाहीतील सर्वात मोठा महोत्सव जाहीर झाल्याचे म्हटले आहे. इतकंच नाहीतर 4 जून 2024 ला 400 पार…असणार असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप, एनडीए निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. सलग तिसऱ्यांदा मतदारांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. 140 कोटी भारतीयांच्या शक्तीने आपले राष्ट्र विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. करोडो लोकांची गरिबीतून मुक्तता झाल्याचे मोदी यांनी भाजपच्या वतीने म्हटले आहे.
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको

