कोल्हापूरनंतर औरंगजेब स्टेटसवरून ‘हे’ शहरही तापलं; एकावर गुन्हा दाखल

कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आता दोन दिवसांनंतर येथील परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. याचदरम्यान आता औरंगजेब वाद पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात पोहचला आहे.

कोल्हापूरनंतर औरंगजेब स्टेटसवरून 'हे' शहरही तापलं; एकावर गुन्हा दाखल
| Updated on: Jun 09, 2023 | 1:18 PM

बीड : कोल्हापुरमधील काही युवकांनी शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशीच औरंगजेबाचे फोटो ठेवत आक्षेपार्ह स्टेटस लावले होते. त्यावरून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आता दोन दिवसांनंतर येथील परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. याचदरम्यान आता औरंगजेब वाद पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात पोहचला आहे. येथील आष्टी शहरातील आझादनगर येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेट्स ठेऊन “बाप तो बाप रहेगा” असा मजकूर टाकल्याने तणाव निर्माण झाला. हिंदू संघटना एकत्र एकवटल्या. त्यानंतर त्या तरूणावर आष्टी पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करत केला आहे. यानंतर आथा हिंदू संघटनेच्या वतीने आष्टी बंदचे अवाहन करण्यात आले आहे. तर वादग्रस्त स्टेटस प्रकरणी शुभम शहाराम लोखंडे (वय-23वर्षे, रा. माळी गल्ली. आष्टी) यांच्या फिर्यादीवरून आष्टी येथील रहीवाशी झैद अय्युब सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता लबेका ग्रुप आष्टी या पेज वर औरंगजेब यांचा फोटो व त्या फोटोला “बाप तो बाप रहेगा” असे वाक्य टाकलेले दिसून आले. त्यानंतर धार्मीक भावना दुखवने, दोन समजामध्ये तेड निर्माण करण्यावरून जैद अय्युद सय्यदच्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Follow us
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.